Skip to product information
1 of 1

UPL Viraat

UPL Viraat

UPL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

UPL Viraat

0
Size
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव UPL 
उत्पादनाचे नाव Viraat  
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Cypermethrin 3%+
Quinalphos 20% EC
रासायनिक गट
Organophosphate +
Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
पोटविष 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

FMC Rogor

Rs. 124.00
Rs. 119.00

Tata Asataf

Rs. 160.00
Rs. 109.00

Syngenta Ekalux

Rs. 279.00
Rs. 225.00

Tata Tafaban

Rs. 169.00

Tata Sonic Flo

Rs. 399.00
Rs. 283.00

IIL Milthion

Rs. 0.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये सायपरमेथ्रिन ३% + क्विनालफॉस् २०% ई.सी. (Cypermethrin 3% + Quinalphos 20% EC) हे रासायनिक घटक असतात. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात टाकल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) आणि ऑर्गनोफॉस्फरस (Organophosphorus) या दोन रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे स्पर्शजन्य आणि पोटविष असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले झाडाचे भाग किंवा पाने खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. क्विनालफॉस् कोलिनेस्टेरेस एन्झाईमला रोखते, तर सायपरमेथ्रिन मज्जातंतूंमधील सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे कीटकाची मज्जासंस्था वेगाने विस्कळीत होऊन त्याला अर्धांगवायू होतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० ते ५०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ लष्करी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कप्पा अळी (DBM)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा

  • बटाटा

    ▸ बटाटा पाकोळी (PTM)
    ▸ कट वर्म्स (खोड कापणारी अळी)
    ▸ पाने खाणारी अळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ लाल भुंगेरे (Pumpkin Beetle)
    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • आले,हळद

    ▸ खोड किडा (Shoot Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ तुडतुडे व पांढरी माशी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे व मावा

  • गवार

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ बोंड अळी (सर्व प्रकारच्या - Bollworms)
    ▸ पांढरी माशी
    ▸ तुडतुडे व मावा

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ चक्री भुंगा (Girdle Beetle) वर अंशतः नियंत्रण

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ चक्री भुंगा (Girdle Beetle) वर अंशतः नियंत्रण

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • हरभरा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • वाटाणा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळमाशी
    ▸ लाल भुंगेरे
    ▸ पाने खाणारी अळी

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
    ▸ लष्करी अळी

  • गहू

    ▸ गुलाबी खोड किडा
    ▸ मावा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा


  • ▸नॉक-डाऊन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे कीटक संपर्कात येताच त्यांना त्वरित जमिनीवर पाडते आणि नष्ट करते.
    ▸अष्टपैलू कीड नियंत्रण: हे प्रामुख्याने बोंड अळी, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि काही प्रमाणात रसशोषक किडींवर प्रभावी आहे.
    ▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींच्या अंड्यांवरही परिणाम करते, ज्यामुळे किडींची नवीन पिढी तयार होण्यास प्रतिबंध होतो.
    ▸व्यापक वापर: हे कपाशी, सोयाबीन, भाजीपाला आणि कडधान्य पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
    ▸किफायतशीर: कमी खर्चात अळ्यांचे प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हे एक उत्तम औषध आहे.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): UPL Viraat हे Group 3A आणि Group 1B चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होऊ शकते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.