Skip to product information
1 of 1

IIL Milthion

IIL Milthion

IIL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

IIL Milthion

0
Size
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव IIL 
उत्पादनाचे नाव Milthion
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Malathion 50% EC
रासायनिक गट
Organophosphate 
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

FMC Rogor

Rs. 124.00
Rs. 119.00

Tata Asataf

Rs. 160.00
Rs. 109.00

Syngenta Ekalux

Rs. 279.00
Rs. 225.00

UPL Viraat

Rs. 0.00

Tata Tafaban

Rs. 169.00

Tata Sonic Flo

Rs. 399.00
Rs. 283.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये मलाथिऑन ५०% ई.सी. (Malathion 50% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे ऑर्गनोफॉस्फरस (Organophosphorus) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे स्पर्शजन्य, पोटविष आणि बाष्प क्रिया असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेला झाडाचा भाग खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे प्रामुख्याने 'ॲसिटिलकोलिनस्टेरेस' (AChE) या एन्झाईमच्या कार्याला रोखते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली ते ५०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • ▸अनेक किडींवर प्रभावी: हे मावा, तुडतुडे, फुलकिडे (Thrips) आणि कोळी (Mites) यांसारख्या विविध प्रकारच्या रसशोषक किडींवर अत्यंत प्रभावी आहे.
    ▸कमी विषारी: इतर ऑर्गनोफॉस्फरस औषधांच्या तुलनेत हे मनुष्य आणि पाळीव प्राण्यांसाठी कमी विषारी मानले जाते.
    ▸साठवणुकीतील किडींसाठी उपयुक्त: याचा वापर गोदामातील साठवणुकीच्या धान्यांवरील कीड नियंत्रणासाठी देखील केला जातो.
    ▸झटपट रिझल्ट: स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीच्या संपर्कात येताच तिला त्वरित नष्ट करण्यास सुरुवात करते.
    ▸बहुआयामी वापर: हे शेतीसोबतच सार्वजनिक आरोग्य आणि डास नियंत्रणासाठी देखील वापरले जाते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): IIL Milthion हे Group 1B गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. निओनिकोटीनोइड्स) कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.