Tata Tafaban
Tata Tafaban
Tata Rallis
Tata Tafaban
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Organophosphate
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये क्लोरपायरीफॉस २०% ई.सी. (Chlorpyriphos 20% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात टाकल्यावर दुधाल पांढरे द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे ऑर्गनोफॉस्फफेट (Organophosphate) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक रासायनिक स्पर्शजन्य आणि पोटविष (Contact and Stomach) गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले पान खाल्ल्यास हे त्यांच्या पोटात जाऊन विषबाधा करते (Stomach Action). याव्यतिरिक्त, याच्या उग्र वासामुळे (Fumigation) कठीण जागी लपलेले कीटक देखील नष्ट होतात.
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कोलिनेस्टेरेस (Cholinesterase) नावाच्या एन्झाइमला रोखण्याचे काम करते, ज्यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी, आळवणी (Drenching), मातीत मिसळणे.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
▸आळवणी : ३ ते ५ मिली प्रती लीटर पाणी (वाळवी किंवा हुमणीसाठी).
▸एकरी प्रमाण : ४०० मिली ते ५०० मिली प्रती एकर (फवारणीसाठी).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ मुळकुज करणारी अळी (Root Grub)
▸ फुलकिडे (Thrips) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ पाने खाणारी अळी
▸ मावा
▸ कप्पेरी अळी -
बटाटा
▸ हुमणी अळी (White Grub)
▸ बटाटा पाकोळी
▸ वाळवी (Termites) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ तांबडे भुंगेरे (Pumpkin Beetle)
▸ फळमाशी -
आले,हळद
▸ कंदमाशी
▸ वाळवी
▸ खोड किडा -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी
▸ कट वर्म्स (खोड कापणारी अळी) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे
▸ फळ पोखरणारी अळी
▸ मुळांतील किडी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
▸ तुडतुडे -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
▸ मावा -
गवार
▸ सर्व प्रकारच्या रसशोषक किडी
-
कापूस
▸ बोंड अळी (Bollworms)
▸ पांढरी माशी
▸ मावा व फुलकिडे -
झेंडू
▸ पाने खाणारी अळी
▸ मावा -
शेवंती
▸ पाने खाणारी अळी
▸ मावा -
सोयाबीन
▸ हुमणी अळी (White Grub)
▸ पाने खाणारी अळी -
भुईमूग
▸ हुमणी अळी (White Grub)
▸ पाने खाणारी अळी -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा
▸ वाळवी -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा
▸ वाळवी -
हरभरा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा
▸ वाळवी -
वाटाणा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा
▸ वाळवी -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळमाशी
▸ पाने खाणारी अळी -
भात
▸ खोड किडा (Stem Borer)
▸ गादमाशी (Gall Midge)
▸ पाने गुंडाळणारी अळी -
गहू
▸ वाळवी (Termites)
▸ मावा -
मका
▸ खोड किडा
▸ लष्करी अळी -
फ्रेंच बिन्स
▸ खोड माशी
▸ मावा
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸अनेक किडींवर प्रभावी: हे मावा, तुडतुडे, अळ्या, खोडकिडा आणि विशेषतः जमिनीतील वाळवी (Termites) व हुमणीच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे.
▸जलद नॉक-डाऊन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीच्या संपर्कात येताच तिला त्वरित नष्ट करण्यास सुरुवात करते.
▸वाळवीसाठी सर्वोत्तम: हे घराच्या बांधकामात किंवा पिकांमध्ये वाळवी रोखण्यासाठी जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे.
▸बाष्प क्रिया (Fumigation): दाट झाडोरा असलेल्या पिकात जिथे औषध थेट पोहोचत नाही, तिथे याच्या वासामुळे लपलेल्या किडी मरतात.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत, परंतु याचा वास उग्र असल्याने फवारताना काळजी घ्यावी.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Tafaban हे Group 1B गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. निओनिकोटीनोइड्स) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता प्रकाश सापळे आणि मशागतीच्या पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या मर्यादित फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि इतर फायदेशीर कीटकासांठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना फवारणी टाळावी.