Skip to product information
1 of 1

Tata Sonic Flo

Tata Sonic Flo

Tata Rallis

Regular price Rs. 283.00 INR
Regular price Rs. 399.00 INR Sale price Rs. 283.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Sonic Flo

MRP: ₹399
283
तब्बल ₹116 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Tata Rallis
उत्पादनाचे नाव Sonic Flo
वापरण्याची पद्धत फवारणी,आळवणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fipronil 5% SC
रासायनिक गट
Phenylpyrazole
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

FMC Rogor

Rs. 124.00
Rs. 119.00

Tata Asataf

Rs. 160.00
Rs. 109.00

Syngenta Ekalux

Rs. 279.00
Rs. 225.00

UPL Viraat

Rs. 0.00

IIL Milthion

Rs. 0.00

Tata Tafaban

Rs. 169.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये फिप्रोनिल ५% एस.सी. (Fipronil 5% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे फिप्रोल/फिनाइलपायराझोल (Phenylpyrazole) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक रासायनिक स्पर्शजन्य, पोटविष आणि मध्यम आंतरप्रवाही गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेला झाडाचा भाग खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे प्रामुख्याने कीटकांच्या GABA-gated क्लोराईड चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन अतिउत्तेजित होऊन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी, आळवणी (Drenching).

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.५ मिली ते २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ३०० मिली ते ५०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
    ▸आळवणी : २ मिली प्रती लीटर पाणी.

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मुळांतील अळी

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कप्पा अळी (DBM)
    ▸ मावा व तुडतुडे

  • बटाटा

    ▸ बटाटा पाकोळी (PTM)
    ▸ कट वर्म्स (खोड कापणारी अळी)
    ▸ पाने खाणारी अळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ लाल भुंगेरे (Pumpkin Beetle)
    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • आले,हळद

    ▸ खोड किडा (Shoot Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ तुडतुडे व पांढरी माशी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • वांगे

    ▸ तुडतुडे व मावा
    ▸ शेंडा पोखरणारी अळी

  • भेंडी

    ▸ तुडतुडे
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ बोंड अळी (सर्व प्रकारच्या - Bollworms)
    ▸ पांढरी माशी
    ▸ तुडतुडे व मावा

  • झेंडू

    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • शेवंती

    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • सोयाबीन

    ▸ हुमणी अळी (White Grub)
    ▸ खोड माशी
    ▸ पाने खाणारी अळी

  • भुईमूग

    ▸ हुमणी अळी (White Grub)
    ▸ खोड माशी
    ▸ पाने खाणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • हरभरा

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • वाटाणा

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फुलकिडे
    ▸ लाल भुंगेरे

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ गादमाशी (Gall Midge)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • गहू

    ▸ वाळवी (Termites)
    ▸ मावा

  • मका

    ▸ खोड किडा
    ▸ लष्करी अळी

  • फ्रेंच बिन्स

    ▸ मावा
    ▸ फुलकिडे

  • ▸थ्रिप्सवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने मिरची, द्राक्षे आणि इतर पिकांमधील फुलकिडे (Thrips) आणि खोडकिडा यांच्या नियंत्रणासाठी उत्कृष्ट मानले जाते.
    ▸वनस्पती वाढीवर सकारात्मक परिणाम (Plant Growth Regulator Effect): याच्या वापरामुळे पिकाची मुळे सशक्त होतात आणि पीक हिरवेगार दिसण्यास मदत होते.
    ▸दुहेरी कृती: हे औषध एकाच वेळी रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्या या दोघांचेही प्रभावी नियंत्रण करते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे मिरची, कपाशी, भात (धान), ऊस आणि भाजीपाला पिकांवर वापरता येते.
    ▸दीर्घकाळ परिणाम: फवारणीनंतर हे झाडाच्या पानांमध्ये टिकून राहते, त्यामुळे किडींपासून दीर्घकाळ संरक्षण मिळते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Tata Sonic Flo हे Group 2B गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.