Skip to product information
1 of 1

IIL Shinwa

IIL Shinwa

IIL

Regular price Rs. 698.00 INR
Regular price Rs. 850.00 INR Sale price Rs. 698.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

IIL Shinwa

MRP: ₹850
698
तब्बल ₹152 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव INSECTICIDES
(INDIA) LIMITED
उत्पादनाचे नाव Shinwa 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fluxametamide 10% w/w EC
रासायनिक गट Isoxazoline
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
जठर विष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Godrej Gracia

Rs. 1,032.00
Rs. 690.00

BASF Exponus

Rs. 1,326.00
Rs. 930.00

Syngenta Simodis

Rs. 1,029.00
Rs. 737.00

Indofil Alecto

Rs. 1,350.00
Rs. 1,015.00

PI Brofreya

Rs. 1,423.00
Rs. 1,144.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये फ्लक्सामेटामाइड १०% डब्लू/डब्लू (Fluxametamide 10% w/w) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळणारे पायस स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे आयसोक्झॅझोलिन (Isoxazoline) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आधुनिक स्पर्शजन्य आणि जठर विष असलेले प्रगत कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते . तसेच किडीने फवारणी झालेला पाला खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते.यामध्ये पानांच्या आरपार जाण्याचा गुणधर्म असल्याने पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या किडींचाही नायनाट होतो.

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे प्रामुख्याने कीटकांच्या GABA आणि Glutamate-gated chloride channels ला विस्कळीत करते. यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते, त्यांना अर्धांगवायू होतो आणि कीटक अन्न खाणे बंद करून काही वेळातच मरतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : १६० मिली ते २०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कळीवरील अळी (Diamondback Moth - DBM)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera)

  • बटाटा

    ▸ कटवर्म (खोड कापणारी अळी)
    ▸ बटाटा कुळका (Potato Tuber Moth)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • आले,हळद

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ कंद माशी (Rhizome Fly) - अंशतः नियंत्रण

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Fruit & Shoot Borer)
    ▸ थ्रिप्स

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • कापूस

    ▸ बोंड अळी (बोंड अळीचे सर्व प्रकार)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • ▸थ्रिप्स आणि अळीवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने मिरचीतील थ्रिप्स (Thrips) आणि विविध पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.
    ▸दुहेरी नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्या या दोघांवरही नियंत्रण मिळवून देते.
    ▸दीर्घकाळ रिझल्ट: एकदा फवारणी केल्यानंतर याचा प्रभाव १० ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहतो.
    ▸त्वरित परिणाम: फवारणीनंतर अवघ्या काही तासांतच कीड खाणे बंद करते, ज्यामुळे पिकाचे होणारे नुकसान लगेच थांबते.
    ▸प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: ज्या किडींवर जुन्या औषधांचा (उदा. इमिडाक्लोप्रिड) परिणाम होत नाही, अशा किडींना मारण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत गुणकारी आहे.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Shinwa हे Group 30 गटातील आहे. किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या गटातील औषध वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस शिफारस केल्यानुसारच घ्यावा. डोस कमी घेतल्यास किडीमध्ये औषधाविरुद्ध ताकद निर्माण होऊ शकते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता निळे व पिवळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी सुरक्षित मानले जाते, तरीही शक्यतो संध्याकाळच्या वेळी फवारणी करणे अधिक हिताचे ठरते.