Godrej Gracia
Godrej Gracia
Godrej Agrovet
Godrej Gracia
97 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये फ्लक्सामेटामाइड १०% डब्लू/डब्लू (Fluxametamide 10% w/w) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळणारे पायस स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे आयसोक्झॅझोलिन (Isoxazoline) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक स्पर्शजन्य आणि जठर विष असलेले प्रगत कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते . तसेच किडीने फवारणी झालेला पाला खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते.यामध्ये पानांच्या आरपार जाण्याचा गुणधर्म असल्याने पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या किडींचाही नायनाट होतो.
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे प्रामुख्याने कीटकांच्या GABA आणि Glutamate-gated chloride channels ला विस्कळीत करते. यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते, त्यांना अर्धांगवायू होतो आणि कीटक अन्न खाणे बंद करून काही वेळातच मरतात.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : १ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : १६० मिली ते २०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिरा कळीवरील अळी (Diamondback Moth - DBM)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera) -
बटाटा
▸ कटवर्म (खोड कापणारी अळी)
▸ बटाटा कुळका (Potato Tuber Moth) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फळमाशी (Fruit Fly)
▸ पाने खाणारी अळी
▸ थ्रिप्स -
आले,हळद
▸ खोड किडा (Stem Borer)
▸ कंद माशी (Rhizome Fly) - अंशतः नियंत्रण -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
▸ फळ पोखरणारी अळी
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Fruit & Shoot Borer)
▸ थ्रिप्स -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स -
गवार
▸ पाने खाणारी अळी
▸ थ्रिप्स -
कापूस
▸ बोंड अळी (बोंड अळीचे सर्व प्रकार)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी
▸ थ्रिप्स
-
झेंडू
▸ कळी पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स -
शेवंती
▸ कळी पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स -
सोयाबीन
▸ पाने गुंडाळणारी अळी
▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
▸ शेंग पोखरणारी अळी -
भुईमूग
▸ पाने गुंडाळणारी अळी
▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
▸ शेंग पोखरणारी अळी -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स
▸ पाने खाणारी अळी -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स
▸ पाने खाणारी अळी -
हरभरा
▸ घाटा अळी (Pod Borer)
-
वाटाणा
▸ घाटा अळी (Pod Borer)
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळ पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स -
भात
▸ खोड किडा (Stem Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder) -
गहू
▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
▸ खोड किडा -
मका
▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
▸ खोड किडा -
फ्रेंच बिन्स
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ थ्रिप्स
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸थ्रिप्स आणि अळीवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने मिरचीतील थ्रिप्स (Thrips) आणि विविध पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.
▸दुहेरी नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्या या दोघांवरही नियंत्रण मिळवून देते.
▸दीर्घकाळ रिझल्ट: एकदा फवारणी केल्यानंतर याचा प्रभाव १० ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहतो.
▸त्वरित परिणाम: फवारणीनंतर अवघ्या काही तासांतच कीड खाणे बंद करते, ज्यामुळे पिकाचे होणारे नुकसान लगेच थांबते.
▸प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: ज्या किडींवर जुन्या औषधांचा (उदा. इमिडाक्लोप्रिड) परिणाम होत नाही, अशा किडींना मारण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत गुणकारी आहे.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): ग्रेसिया हे Group 30 गटातील आहे. किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या गटातील औषध वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस शिफारस केल्यानुसारच घ्यावा. डोस कमी घेतल्यास किडीमध्ये औषधाविरुद्ध ताकद निर्माण होऊ शकते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता निळे व पिवळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी सुरक्षित मानले जाते, तरीही शक्यतो संध्याकाळच्या वेळी फवारणी करणे अधिक हिताचे ठरते.