Syngenta Alika
Syngenta Alika
Syngenta
Syngenta Alika
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Lambda-cyhalothrin 9.5% ZC
Pyrethroids
स्पर्शजन्य
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये थायमेथॉक्साम १२.६०% + लॅम्बडा-सायहेलोथ्रिन ९.५०% झेड.सी. (Thiamethoxam 12.60% + Lambda-cyhalothrin 9.50% ZC) हे रासायनिक घटक असतात. जो ZC स्वरूपात असतो. ZC म्हणजे 'कॅप्सूल सस्पेन्शन' आणि 'सस्पेन्शन कन्सन्ट्रेट' यांचे आधुनिक मिश्रण आहे.
-
रासायनिक गट
▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) आणि सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या दोन रासायनिक गटांचे प्रबळ मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर दुहेरी वार करते. थायमेथॉक्साम निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते, तर लॅम्बडा-सायहेलोथ्रिन सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन पूर्णपणे विस्कळीत होते, किडीला अर्धांगवायू होतो आणि तिचा त्वरित मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.४ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : ८० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिरामाग अळी (DBM)
▸ मावा (Aphids)
▸ गड्डा पोखरणारी अळी -
बटाटा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फळमाशी (Fruit Fly)
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ पाने खाणारी अळी
▸ भुंगेरे (Beetles) -
आले,हळद
▸ कंदमाशी
▸ पाने गुंडाळणारी अळी
▸ लष्करी अळी -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी
▸ पांढरी माशी
▸ फुलकिडे -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा
▸ फळ पोखरणारी अळी
▸ कोळी (काही प्रमाणात नियंत्रण) -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
▸ तुडतुडे
▸ मावा -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी -
गवार
▸ रसशोषक किडी
▸ पाने खाणारी अळी -
कापूस
▸ बोंड अळी (Bollworms)
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी
▸ फुलकिडे -
झेंडू
▸ फुलकिडे
▸ अळी -
शेवंती
▸ फुलकिडे
▸ अळी -
सोयाबीन
▸ चक्री भुंगा (Girdle Beetle)
▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
▸ खोड माशी (Stem Fly)
▸ तुडतुडे -
भुईमूग
▸ चक्री भुंगा (Girdle Beetle)
▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
▸ खोड माशी (Stem Fly)
▸ तुडतुडे -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ मावा
▸ तुडतुडे -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ मावा
▸ तुडतुडे -
हरभरा
▸ घाटा अळी (Pod Borer)
▸ मावा -
वाटाणा
▸ घाटा अळी (Pod Borer)
▸ मावा -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळमाशी
▸ पांढरी माशी
▸ फुलकिडे -
भात
▸ खोड किडा (Stem Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
▸ निळे भुंगेरे (Blue Beetle)
▸ लष्करी अळी -
गहू
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ मावा
▸ खोड किडा -
मका
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ मावा
▸ खोड किडा -
फ्रेंच बिन्स
▸ पाने खाणारी अळी
▸ मावा
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸रुंद पल्ल्याचे नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. मावा, तुडतुडे, थ्रिप्स) आणि पाने खाणाऱ्या अळ्या (उदा. बोंड अळी) या दोन्हीवर अत्यंत प्रभावी आहे.
▸झटपट आणि दीर्घकालीन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीला त्वरित नष्ट करते, तर आंतरप्रवाही गुणामुळे पिकाला दीर्घकाळ संरक्षण देते.
▸उत्कृष्ट तंत्रज्ञान: यातील झेड.सी. (ZC) तंत्रज्ञानामुळे औषध पानांवर दीर्घकाळ टिकते आणि कडक उन्हातही त्याचे कार्य सुरू राहते.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग आणि भाजीपाला पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी उत्कृष्ट आहे.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Syngenta Alikaहे Group 4A आणि Group 3A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे, कामगंध सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.