Bayer Solomon
Bayer Solomon
Bayer
Bayer Solomon
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Imidacloprid 19.81% OD
Neonicotinoids
स्पर्शजन्य
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये बीटा-सायफ्लुथ्रिन ८.४९% + इमिडाक्लोप्रिड १९.८१% डब्ल्यू/डब्ल्यू ओ.डी. (Beta-cyfluthrin 8.49% + Imidacloprid 19.81% w/w OD) हे रासायनिक घटक असतात. जो OD स्वरूपात असतो. OD म्हणजे तेलकट द्रव स्वरूप (Oil Dispersion) आहे, जे पानांवर उत्तमरीत्या पसरते.
-
रासायनिक गट
▸हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) आणि निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या दोन रासायनिक गटांचे प्रबळ मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक संयुक्त (Combination) रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) आणि स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर दुहेरी हल्ला करते. बीटा-सायफ्लुथ्रिन मज्जातंतूंमधील सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते, तर इमिडाक्लोप्रिड निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते. या एकत्रित परिणामामुळे कीटकांची मज्जासंस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन त्यांना अर्धांगवायू होतो आणि त्यांचा त्वरित मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.७५ मिली ते १ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : १५० मिली ते २०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ लष्करी अळी -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिरा कप्पा अळी (DBM)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे -
बटाटा
▸ मावा व तुडतुडे
▸ बटाटा पाकोळी (PTM) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ लाल भुंगेरे (Red Pumpkin Beetle)
▸ फळमाशी
▸ फुलकिडे -
आले,हळद
▸ पाने खाणारी अळी
▸ खोड किडा -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी
▸ पांढरी माशी
▸ तुडतुडे -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ फळ पोखरणारी अळी
▸ मावा व पांढरी माशी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
▸ तुडतुडे व मावा -
गवार
▸ सर्व प्रकारच्या रसशोषक किडी
-
कापूस
▸ गुलाबी बोंड अळी
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी
▸ मावा व फुलकिडे -
झेंडू
▸ फुलकिडे
▸ पाने खाणारी अळी -
शेवंती
▸ फुलकिडे
▸ पाने खाणारी अळी -
सोयाबीन
▸ चक्री भुंगा (Girdle Beetle)
▸ खोड माशी (Stem Fly)
▸ पाने खाणारी अळी (Spodoptera) -
भुईमूग
▸ चक्री भुंगा (Girdle Beetle)
▸ खोड माशी (Stem Fly)
▸ पाने खाणारी अळी (Spodoptera) -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा व तुडतुडे
▸ फुलकिडे -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा व तुडतुडे
▸ फुलकिडे -
हरभरा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा व तुडतुडे
▸ फुलकिडे -
वाटाणा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ मावा व तुडतुडे
▸ फुलकिडे -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळमाशी
▸ पाने खाणारी अळी
▸ तुडतुडे -
भात
▸ खोड किडा
▸ पाने गुंडाळणारी अळी
▸ तपकिरी तुडतुडे -
गहू
▸ मावा (Aphids)
▸ गुलाबी खोड किडा -
मका
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ खोड किडा -
फ्रेंच बिन्स
▸ मावा
▸ शेंग पोखरणारी अळी
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸बहुविध कीड नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. मावा, तुडतुडे) आणि विविध प्रकारच्या अळ्या (उदा. शेंडा व फळ पोखरणारी अळी) यांच्यावर अत्यंत प्रभावी आहे.
▸ओ.डी. (OD) तंत्रज्ञान: तेलकट स्वरूपामुळे हे औषध पानांवर दीर्घकाळ टिकून राहते आणि पावसामुळे लवकर धुतले जात नाही (Rainfastness).
▸झटपट नॉक-डाऊन: याच्या स्पर्शजन्य गुणामुळे किडींच्या संपर्कात येताच त्यांचे नुकसान त्वरित थांबते.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या नवीन वाढणाऱ्या भागांचे आणि कोवळ्या पानांचेही किडींपासून संरक्षण करते.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे सोयाबीन, कापूस, वांगी आणि इतर भाजीपाला पिकांवरील किडींच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Solomon हे Group 3A आणि Group 4A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. डायमाइड्स) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होऊ शकते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे, चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.