Ridomil Gold + Actara + Isabion Drenching Kit

Ridomil Gold + Actara + Isabion Drenching Kit

Farmspot

Regular price Rs. 1,940.00 INR
Regular price Rs. 2,437.00 INR Sale price Rs. 1,940.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Ridomil Gold + Actara + Isabion Drenching Kit

MRP: ₹2437
1940
तब्बल ₹497 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक  Syngenta
किट नाव Ridomil Gold + Actara 
+ Isabion 
वापरण्याची पद्धत आळवणी 

घटक माहिती

Composition Details

Ridomil Gold Metalaxyl-M 4% w/w + Mancozeb 64% w/w 
Actara  Thiamethoxam 25% WG
Isabion  Amino Acids & Nutrients

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Matco Gold + Token + Maxilizer Spray Kit

Rs. 1,930.00

Sixer + Areva + Dhanzyme Gold Spray Kit

Rs. 1,428.00
Rs. 884.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Ridomil Gold: यामध्ये मेटलॅक्झिल-एम ४% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Actara: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड्स आणि पोषक तत्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : अॅसिलॅलानाइन+ क्लोरोनिट्रिल गट.
    ▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.
    ▸ इसाबियन : जैविक घटक (Amino acids).

  • उत्पादन प्रकार

    ▸ Ridomil Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Actara हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Ridomil Gold (Metalaxyl-M 4% + Mancozeb 64% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
    ▸ Actara (Thiamethoxam 25% WG) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो, हालचाल कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
    हे विशेषतः रस शोषणारे कीटक (मावा, पांढरी माशी, थ्रिप्स) यांच्यावर प्रभावी आहे.

    ▸ Isabion (Amino Acids + Nutrients) :
    हे अमिनो आम्ल व अन्नद्रव्ययुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. अमिनो आम्ले ताणतणाव (उष्णता, थंडी, पाण्याचा ताण) कमी करण्यास मदत करतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढ, फुलधारणा व फळधारणा सुधारतात. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ, गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Ridomil Gold: 2 ग्रॅम
    ▸ Actara: 0.5 ग्रॅम
    ▸ Isabion: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Ridomil Gold: 30 ग्रॅम
    ▸ Actara: 7.5 ग्रॅम
    ▸ Isabion: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Ridomil Gold: 400 ग्रॅम
    ▸ Actara: 100 ग्रॅम
    ▸ Isabion: 400 मिली

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    ▸  यामधील Ridomilgold या बुरशीनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Actara या बुरशीनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामध्ये Isabion उत्पादनाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Ridomilgold या बुरशीनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Actara या कीटकनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Isabion उत्पादनाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Syngenta RidomilGold

  • 2. Syngenta Actara

  • 3. Syngenta Isabion