Folio Gold + Actara + Isabion Drenching Kit
Folio Gold + Actara + Isabion Drenching Kit
Farmspot
Folio Gold + Actara + Isabion Drenching Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
+ Isabion
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटलॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Actara: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड्स आणि पोषक तत्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ मेटलॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : अॅसिलॅलानाइन+ क्लोरोनिट्रिल गट.
▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.
▸ इसाबियन : जैविक घटक (Amino acids). -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Actara हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
आळवणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Chlorothalonil हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून मुळांच्या आसपासच्या भागात संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे जमिनीतून होणारे बुरशीजन्य रोग (डॅम्पिंग ऑफ, रूट रॉट, ब्लाइट) यावर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
▸ Actara (Thiamethoxam 25% WG) :
आळवणीनंतर हे कीटकनाशक मुळांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो, हालचाल कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
हे विशेषतः जमिनीतून व वरच्या भागात येणारे रस शोषणारे कीटक (मावा, पांढरी माशी, थ्रिप्स) यांच्यावर प्रभावी नियंत्रण देते.
▸ Isabion (Amino Acids + Nutrients) :
हे अमिनो आम्ल व अन्नद्रव्ययुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. आळवणीनंतर मुळांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. अमिनो आम्ले मुळांची वाढ सुधारतात व ताणतणाव (उष्णता, पाण्याचा ताण) कमी करतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्ये पोषण संतुलन सुधारतात.
यामुळे मुळांची वाढ मजबूत होते, झाडाची जोमदार वाढ होते व उत्पादनक्षमता वाढते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Actara: 0.5 ग्रॅम
▸ Isabion: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Actara: 7.5 ग्रॅम
▸ Isabion: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Actara: 100 ग्रॅम
▸ Isabion: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम, फ्युजारीयम या जमिनीमधून पसरणाऱ्या बुरशीमुळे रोपमर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच पुढील 10 ते 15 दिवसात नव्याने रोपांची मर होत नाही.
▸यामधील Actara या कीटकनाशकाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे या रसशोषक किडींवर त्याचबरोबर नागअळी, काळी कुरतडणारी अळी, हुमणी,भुंगेरे किडे या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या पोषक उत्पादनाचा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत होते रोपांच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸या अळवणी किट चा वापर केल्यामुळे यामधील उत्पादनाचा फायटोटॉनिक परिणामामुळे रोपांच्या मुळांची खोलवर वाढ होते व पुढे जाऊन रूट कॉईलिंगची येणारी अडचण येत नाही. -
आले/हळद
▸कंद उगवणीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम फ्युजारीयम या जमिनीमधून पसरणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कुज, उगवून आलेले कोंब मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामधील Folio Gold चा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मर रोगावर नियंत्रण मिळते.
▸यामधील Actara चा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या व पानांचे नुकसान करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. तसेच जमिनीमधील येणाऱ्या काळी कुरतडणारी अळी, हुमणी, वाळवी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion चा वापर आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते. कोंब जमिनी बाहेर आल्यावर त्यावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो.
▸या आळवणी किटचा वापर केल्यामुळे बुरशीजन्य रोग, किडी यावर नियंत्रण मिळण्याबरोबर रोपांवर आलेलाजैविक व अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta Actara
-
2. Syngenta Foliogold
-
3. Syngenta Isabion
-