Skip to product information
1 of 1

FMC Benevia

FMC Benevia

FMC

Regular price Rs. 599.00 INR
Regular price Rs. 1,075.00 INR Sale price Rs. 599.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

FMC Benevia

MRP: ₹1075
599
तब्बल ₹476 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव FMC
उत्पादनाचे नाव  Benevia
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Cyantraniliprole 10.26% OD
रासायनिक गट Diamides
कीटकनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

FMC Coragen

Rs. 220.00
Rs. 129.00

Dhanuka Cover

Rs. 597.00
Rs. 370.00

FMC Corprima

Rs. 560.00

Bayer Fame

Rs. 1,410.00
Rs. 1,096.00

Bayer Vayego

Rs. 850.00
Rs. 599.00

Tata Patang

Rs. 1,895.00
Rs. 1,250.00

Coromandel Prachand

Rs. 1,008.00
Rs. 737.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये सायँट्रानिलिप्रोल १०.२६% ओ.डी. (Cyantraniliprole 10.26% OD) हा रासायनिक घटक असतो. जो OD स्वरूपात असतो. OD म्हणजे तेलावर आधारित विद्राव्य स्वरूप (Oil Dispersion) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे अँथ्रानिलिक डायनामाइड्स (Anthranilic diamides) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीद्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या स्नायू संस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या स्नायूंमधील 'रायानोडिन रिसेप्टर्स' (RyR) ला बांधले जाते, ज्यामुळे स्नायूंच्या पेशींमधील कॅल्शियमचा साठा अनियंत्रितपणे बाहेर पडतो. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे त्वरित बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.५ मिली ते २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ३६० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM)
    ▸ तंबाखूवरील लष्करी अळी
    ▸ पांढरी माशी

  • बटाटा

    ▸ पांढरी माशी
    ▸ मावा (Aphids)
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स आणि पांढरी माशी

  • आले,हळद

    ▸ खोड किडा
    ▸ थ्रिप्स

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ नागअळी (Leaf Miner)
    ▸ थ्रिप्स

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स (Thrips)
    ▸ पांढरी माशी
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ नागअळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ खोड किडा

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ पांढरी माशी
    ▸ बोंड अळी (Bollworms)
    ▸ थ्रिप्स

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ चक्रभुंगा (Girdle Beetle)
    ▸ खोड माशी (Stem Fly)
    ▸ तंबाखूवरील लष्करी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ नागअळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ नागअळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स

  • भात

    ▸ खोड किडा
    ▸ पान गुंडाळणारी अळी

  • गहू

    ▸ खोड किडा / मावा

  • मका

    ▸ अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी

  • ▸बहुआयामी नियंत्रण: हे कीटकनाशक एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. पांढरी माशी, थ्रिप्स) आणि अळी वर्गातील किडींवर (उदा. फळ पोखरणारी अळी) उत्कृष्ट नियंत्रण देते.
    ▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांमध्ये लवकर शोषले जाते आणि नवीन येणाऱ्या पानांपर्यंतही पोहोचते, त्यामुळे पिकाला संपूर्ण संरक्षण मिळते.
    ▸पीक जोमदार बनवते: याच्या वापरामुळे पीक हिरवेगार दिसते आणि झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते (Crop Power).
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय पिके आणि कापूस यांसारख्या पिकांवर वापरता येते.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Beneviaहे Group 28 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. चुकीच्या डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होऊ शकते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रसायनांवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मित्र कीटकांना (उदा. लेडीबर्ड बीटल) तुलनेने सुरक्षित आहे, परंतु मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळणे योग्य ठरते.