Skip to product information
1 of 1

Bayer Decis 100

Bayer Decis 100

Bayer

Regular price Rs. 163.00 INR
Regular price Rs. 220.00 INR Sale price Rs. 163.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Bayer Decis 100

MRP: ₹220
163
तब्बल ₹57 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव Decis 100
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Deltamethrin 11% EC
रासायनिक गट Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Syngenta Karate

Rs. 109.00
Rs. 107.00

FMC Talstar Plus

Rs. 890.00
Rs. 855.00

FMC Brigade Power

Rs. 737.00
Rs. 566.00

GSP Slayer Pro

Rs. 772.00
Rs. 342.00

Tata fen

Rs. 305.00
Rs. 195.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये डेल्टामेथ्रिन ११% डब्ल्यू/डब्ल्यू ई.सी. (Deltamethrin 11% w/w EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक रासायनिक स्पर्शजन्य आणि पोटविष (Contact and Stomach) गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेला झाडाचा भाग किंवा पाने खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे मज्जातंतूंमधील सोडियम चॅनेल (Sodium Channels) उघडे ठेवते, ज्यामुळे संदेशवहन अतिउत्तेजित होऊन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला त्वरित अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.५ मिली ते ०.७५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : १०० मिली ते १२५ मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिराकुड्या कडा (Diamond Back Moth)
    ▸ पाने खाणारी अळी

  • बटाटा

    ▸ मावा
    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ तांबड्या भुंगेरा (Red Pumpkin Beetle)
    ▸ फळमाशी

  • आले,हळद

    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ मावा, तुडतुडे

  • वांगे

    ▸ शेंडे आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी

  • कापूस

    ▸ गुलाबी बोंड अळी (Pink Bollworm)
    ▸ ठिपक्यांची बोंड अळी (Spotted Bollworm)
    ▸ अमेरिकन बोंड अळी (Heliothis)

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)

  • हरभरा

    ▸ घाटे अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ घाटे अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळमाशी
    ▸ तांबड्या भुंगेरा

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Armyworm)
    ▸ खोड कीड

  • मका

    ▸ लष्करी अळी (Armyworm)
    ▸ खोड कीड

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • ▸जलद नॉक-डाऊन परिणाम: हे अतिशय प्रभावशाली असून कीटकांच्या संपर्कात येताच त्यांना त्वरित जमिनीवर पाडते आणि नष्ट करते.
    ▸अनेक किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने फळ पोखरणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी, बोंड अळी आणि काही रसशोषक किडींवर उत्कृष्ट नियंत्रण देते.
    ▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींच्या अंड्यांवरही परिणाम करते, ज्यामुळे किडींची पुढची पिढी रोखण्यास मदत होते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कापूस, भाजीपाला (वांगी, भेंडी), फळपिके आणि कडधान्य पिकांवर प्रभावीपणे वापरता येते.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार योग्य प्रमाणात वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Decis १०० हे Group 3A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा जलाशय जवळ असताना फवारणी टाळावी.