Skip to product information
1 of 1

20:20:20 + Radifarm Drenching kit

20:20:20 + Radifarm Drenching kit

Farmspot Shop

Regular price Rs. 2,100.00 INR
Regular price Rs. 2,625.00 INR Sale price Rs. 2,100.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

20:20:20 + Radifarm Drenching kit

MRP: ₹2625
2100
तब्बल ₹525 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Valagro 
किट नाव 20:20:20 + Radifarm
वापरण्याची पद्धत आळवणी

घटक माहिती

Composition Details

20:20:20  NPK 20:20:20
Radifarm 3.0% N (including
1% organic) and 8.0% 

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

13:40:13 + Biozyme Drip Drenching kit

Big Kit (13:40:13 1 kg + Biozyme Drip 1 liter)
Rs. 1,070.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Valagro 20:20:20: यामध्ये नत्र २०%, स्फुरद २०% आणि पालाश २०% (NPK 20:20:20 + TE) हे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतात.
    ▸ Radifarm: यामध्ये ३.०% नत्र, ८.०% पालाश, पॉलिसेकेराइड्स, अमिनो ॲसिड्स आणि जीवनसत्त्वे हा जैव-उत्तेजक (Root Growth Promoter) घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ NPK 20:20:20 : मुख्य अन्नद्रव्य (Primary Nutrients) गट.
    ▸ Radifarm : वनस्पतीजन्य सेंद्रिय जैव-उत्तेजक (Organic Biostimulant) गट.

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ 20:20:20 (Balanced N:P:K Fertilizer) :
    हे एक संपूर्ण संतुलित विद्रव्य खत आहे, ज्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश समान प्रमाणात असतात. आळवणीद्वारे दिल्यास हे पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी कार्य करते. हे एकाच वेळी शाखीय वाढ (नत्र), मुळांचा विकास (स्फुरद) आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती (पालाश) वाढवण्यास मदत करते. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत संतुलित पोषण देण्यासाठी हे खत अत्यंत उपयुक्त आहे.

    ▸ Radifarm (Biostimulant) :
    हे वनस्पतींच्या मुळांच्या विकासासाठी बनवलेले एक विशेष 'रूट प्रमोटर' आहे. आळवणीनंतर हे मुख्यत्वे करून नवीन पांढऱ्या मुळांची (Secondary and capillary roots) वाढ वेगाने करण्यास मदत करते. यामध्ये असलेले सेंद्रिय घटक आणि पोषक तत्वे रोप लागवडीनंतर येणारा ताण (Transplantation stress) कमी करतात, ज्यामुळे रोप जमिनीशी लवकर सेट होते आणि अन्नाचा उपसा प्रभावीपणे सुरू करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Valagro 20:20:20: 6 ग्रॅम
    ▸ Radifarm: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Valagro 20:20:20: 90 ग्रॅम
    ▸ Radifarm: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Valagro 20:20:20: 1.2 किलो
    ▸ Radifarm: 400 मिली

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    यामधील Valagro Radifarm चा  वापर केल्यामुळे रोपांवर पुनर लागवड केल्यानंतर जो ताण येतो तो ताण कमी होतो. रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ होते व रोपे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला सुरुवात करतात. ज्यामुळे रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा येतो. यामधील 20:20:20 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते रोपे सेट होऊन रोपांना नवीन दोन पानांचा शेंडा येतो.रोपांची पाने हिरवीगार, रुंद, पसरट होतात. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Valagro Radifarm या उत्पादनाचा वापर केल्यामुळे कंद उगवून आल्यानंतर वातावरणाचा आलेला ताण कमी होतो. कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण वाढते.
    ▸यामधील Valagro 20:20:20 चा वापर केल्यामुळे कंदाच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, कंदमुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात, ज्यामुळे नवीन फुटवे निघायला लागतात निघणारे फुटवे जोमदार निघतात. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Valagro 20:20:20

  • 2. Valagro Radifarm