Skip to product information
1 of 1

UPL Lancer Gold

UPL Lancer Gold

UPL

Regular price Rs. 303.00 INR
Regular price Rs. 427.00 INR Sale price Rs. 303.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

UPL Lancer Gold

MRP: ₹427
303
तब्बल ₹124 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव UPL
उत्पादनाचे नाव Lancer Gold
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Acephate 50% +
Imidacloprid 1.8% SP
रासायनिक गट
Organophosphate +
Neonicotinoids
कीटकनाशक प्रकारआंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये ॲसेफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८% एस.पी. (Acephate 50% + Imidacloprid 1.8% SP) हे रासायनिक घटक असतात. जो SP स्वरूपात असतो. SP म्हणजे पाण्यात विरघळणारी भुकटी (Soluble Powder) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे ऑर्गनोफॉस्फरस (Organophosphorus) आणि निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या दोन रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे प्रबळ आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. यातील ॲसेफेट कोलिनेस्टेरेस एन्झाईम रोखते, तर इमिडाक्लोप्रिड निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते. या एकत्रित परिणामामुळे कीटकांची मज्जासंस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन त्यांना अर्धांगवायू होतो आणि त्यांचा त्वरित मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे
    ▸ हिरा कप्पा अळी (DBM)

  • बटाटा

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ बटाटा पाकोळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ पांढरी माशी
    ▸ फुलकिडे

  • आले,हळद

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ खोड किडा

  • टोमॅटो

    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ तुडतुडे
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • वांगे

    ▸ तुडतुडे व मावा
    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी

  • भेंडी

    ▸ तुडतुडे
    ▸ मावा
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ सर्व प्रकारच्या रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ तुडतुडे व मावा
    ▸ फुलकिडे
    ▸ बोंड अळी (सुरुवातीची अवस्था)

  • झेंडू

    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • शेवंती

    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
    ▸ तुडतुडे व मावा

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
    ▸ तुडतुडे व मावा

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ फुलकिडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ फुलकिडे

  • हरभरा

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ फुलकिडे

  • वाटाणा

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ फुलकिडे

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ मावा व फुलकिडे
    ▸ तुडतुडे

  • भात

    ▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
    ▸ हिरवे तुडतुडे
    ▸ खोड किडा

  • गहू

    ▸ मावा (Aphids)

  • मका

    ▸ खोड किडा
    ▸ मावा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ मावा
    ▸ फुलकिडे

  • ▸सर्वसमावेशक कीड नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. मावा, तुडतुडे, थ्रिप्स) आणि पाने खाणाऱ्या अळ्या (बोंड अळी) या दोन्हीवर अत्यंत प्रभावी आहे.
    ▸प्रतिकारशक्ती तोडणारे औषध: दोन वेगवेगळ्या गटांचे मिश्रण असल्यामुळे ज्या किडींमध्ये एका औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, त्यांचेही हे नियंत्रण करते.
    ▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे लवकर शोषले जाते, त्यामुळे पावसाचा परिणाम कमी होतो आणि नवीन वाढणाऱ्या फुटव्यांचेही संरक्षण होते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कपाशी, मिरची आणि भाजीपाला पिकांवरील किडींच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): UPL Lancer Gold हे Group 1B आणि Group 4A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप्सचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.