Skip to product information
1 of 1

Tata Rallis KORANDA

Tata Rallis KORANDA

Tata Rallis

Regular price Rs. 449.00 INR
Regular price Rs. 665.00 INR Sale price Rs. 449.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Rallis KORANDA

MRP: ₹665
449
तब्बल ₹216 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Tata Rallis
उत्पादनाचे नाव KORANDA 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Chlorpyrifos 50% +
Cypermethrin 5% EC
रासायनिक गट
Organophosphate +
Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य+
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Gharda HAMLA 550

Rs. 380.00
Rs. 249.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ई.सी. (Chlorpyrifos 50% + Cypermethrin 5% EC) हे रासायनिक घटक असतात. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे ऑर्गनोफॉस्फरस (Organophosphorus) आणि सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या दोन रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे स्पर्शजन्य आणि पोटविष असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेला झाडाचा भाग खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action). यातील बाष्प क्रियेमुळे लपलेले कीटकही वासाने नष्ट होतात.

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. क्लोरपायरीफॉस कोलिनेस्टेरेस एन्झाईमला रोखते, तर सायपरमेथ्रिन सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते. या एकत्रित परिणामामुळे कीटकांची मज्जासंस्था विस्कळीत होऊन त्यांना तीव्र अर्धांगवायू होतो आणि त्यांचा त्वरित मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ लष्करी अळी (Spodoptera)
    ▸ मुळांतील किडी

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कप्पा अळी (DBM)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा

  • बटाटा

    ▸ बटाटा पाकोळी (PTM)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ जमिनीतील वाळवी / हुमणी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ तांबडे भुंगेरे (Pumpkin Beetle)
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • आले,हळद

    ▸ खोड किडा
    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ वाळवी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे व पांढरी माशी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कोळी (Mites) वर अंशतः नियंत्रण

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
    ▸ तुडतुडे

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ गुलाबी बोंड अळी (Pink Bollworm)
    ▸ अमेरिकन व ठिपक्यांची बोंड अळी
    ▸ पांढरी माशी व तुडतुडे

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ खोड माशी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ खोड माशी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • हरभरा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • वाटाणा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळमाशी
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ तांबडे भुंगेरे

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ लष्करी अळी

  • गहू

    ▸ गुलाबी खोड किडा
    ▸ मावा व वाळवी

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा

  • ▸अष्टपैलू कीड नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी आणि सर्व प्रकारच्या अळ्या (उदा. बोंड अळी, लष्करी अळी) यांच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे.
    ▸नॉक-डाऊन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीच्या संपर्कात येताच तिला त्वरित नष्ट करण्यास सुरुवात करते.
    ▸बाष्प क्रिया (Fumigation): दाट पाने असलेल्या पिकात जिथे औषध थेट पोहोचत नाही, तिथे याच्या वासामुळे लपलेले कीटकही मरतात.
    ▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींच्या अंड्यांवरही परिणाम करते, ज्यामुळे किडींची पुढची पिढी रोखण्यास मदत होते.
    ▸किफायतशीर: इतर महागड्या कीटकनाशकांच्या तुलनेत हे कमी खर्चात जलद आणि मोठे परिणाम देते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Tata Rallis KORANDA हे Group 1B आणि Group 3A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.