Tata Master + Pager Spray Kit

Tata Master + Pager Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,376.00 INR
Regular price Rs. 1,733.00 INR Sale price Rs. 1,376.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Master + Pager Spray Kit

MRP: ₹1733
1376
तब्बल ₹357 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Tata Rallis + Dhanuka 
किट नाव Tata Master + Pager
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Tata Master MetalaxylM 8% + Mancozeb 64% WP
Pager Diafenthiuron 50% WP

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Ridomil Gold + Pegasus Spray Kit

For 200 liter water (Ridomil Gold 500 gram + Pegasus 250 gram)
Rs. 2,514.00
Rs. 1,800.00

Tata Master + Pager Spray Kit

For 250 liter water (Tata Master 500 gram + Pager 250 gram)
Rs. 1,733.00
Rs. 1,376.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Tata Master : यामध्ये मेटलॅक्झिल-एम 8% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Pager: यामध्ये डायफेनथ्र्युरॉन 50% WP हे कीटकनाशक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झिल-एम + मॅन्कोझेब : ॲसिलॅलानाइन + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ सायनिट्रानिलीप्रोल + डायफेनथ्र्युरॉन :डायमाइड + थायोयुरिया गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Tata Master हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Pager हे स्पर्शजन्य (Contact) आणि पोटावाटे विष (Stomach) म्हणून कार्य करणारे कीटकनाशक व कोळीनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸Tata Master (Metalaxyl-M 8% + Mancozeb 64% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.

    ▸ Dhanuka Pager (Diafenthiuron 50% WP)
    हे कीटकांच्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करते. हे कीटकांच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'ला (Mitochondria) लक्ष्य करते, ज्यामुळे कीटकांच्या शरीरातील ऊर्जा निर्मिती बंद होते. यामुळे कीटक हालचाल करणे आणि अन्न खाणे त्वरित थांबवतात आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Tata Master 2 ग्रॅम
    ▸ Pager: 1.25 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Tata Master: 30 ग्रॅम
    ▸ Pager: 15 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Tata Master: 400 ग्रॅम
    ▸ Pager: 200 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (Leaf Hopper), थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer) व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • 1. Tata Master

  • 2. Dhanuka Pager

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.