Skip to product information
1 of 1

Tata Master + Areva + Isabion Drenching kit

Tata Master + Areva + Isabion Drenching kit

Farmspot Shop

Regular price Rs. 1,544.00 INR
Regular price Rs. 2,041.00 INR Sale price Rs. 1,544.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Master + Areva + Isabion Drenching kit

MRP: ₹2041
1544
तब्बल ₹497 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Tata Rallis + Dhanuka+
Syngenta
किट नाव Tata Master+ Areva +
Isabion 
वापरण्याची पद्धत आळवणी

घटक माहिती

Composition Details

Tata Master  Metalaxyl 8%+
Mancozeb 64%WP
Areva  Thiamethoxam 25% WG
Isabion   Peptides +
free amino acids.

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Tata Master: यामध्ये मेटालॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Areva: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड आणि पोषक तत्वांचे मिश्रण (Amino Acids + Nutrients) हा नैसर्गिक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ मेटालॅक्झिल + मॅन्कोझेब : असाईलअलॅनाइन + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Tata Master हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Areva हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Tata Master (Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP) :
    आळवणीद्वारे वापरल्यानंतर 'मेटॅलॅक्सिल' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो. 'मॅन्कोझेब' हा संपर्कजन्य (Contact) घटक मुळांच्या आसपासच्या भागात संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो.

    ▸ Areva (Thiamethoxam 25% WG) :
    हे एक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक असून आळवणीद्वारे वापरल्यानंतर मुळांद्वारे शोषले जाते व संपूर्ण झाडामध्ये पसरते. 'थियामेथोक्झाम' हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करून कीटकांची संदेशवहन यंत्रणा विस्कळीत करतो. यामुळे कीटक खाणे बंद करतात, त्यांची हालचाल कमी होते व शेवटी त्यांचा मृत्यू होतो.

    ▸ Isabion (Peptides + Free Amino Acids) :
    हे नैसर्गिक अमिनो आम्ल आणि पेप्टाइड्सयुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) आहे. आळवणीनंतर मुळांद्वारे शोषले जाऊन हे झाडाच्या चयापचय प्रक्रियेला वेग देते. हे प्रामुख्याने पांढऱ्या मुळांचा विस्तार वाढवते, झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हवामानातील बदलांमुळे येणारा ताण (उष्णता, पाण्याचा ताण) कमी करून पिकाची जोमदार वाढ करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Tata Master: 2 ते 2.5 ग्रॅम
    ▸ Areva: 0.4 ग्रॅम
    ▸ Isabion: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Tata Master: 30 ते 37 ग्रॅम
    ▸ Areva: 6 ग्रॅम
    ▸ Isabion: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Tata Master: 400 ते 500 ग्रॅम
    ▸ Areva: 80 ग्रॅम
    ▸ Isabion: 400 मिली

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    ▸  यामधील Tata Master या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Areva या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामध्ये Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Tata Master या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Areva या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे  उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Dhanuka Areva

  • 2. Tata Rallis Tata Master

  • 3. Syngenta Isabion