Skip to product information
1 of 1

Syngenta Minecto Xtra

Syngenta Minecto Xtra

Syngenta

Regular price Rs. 635.00 INR
Regular price Rs. 699.00 INR Sale price Rs. 635.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Syngenta Minecto Xtra

MRP: ₹699
635
तब्बल ₹64 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta
उत्पादनाचे नाव  Minecto Xtra
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Cyantraniliprole 16.9% + Lufenuron 16.9% w/w SC
रासायनिक गट Diamides +
Benzoylureas
कीटकनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये सायँट्रानिलिप्रोल १६.९% + लुफेन्युरॉन १६.९% एस.सी. (Cyantraniliprole 16.9% + Lufenuron 16.9% w/w SC) हे रासायनिक घटक असतात. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पाण्यात मिसळणारे घट्ट द्रावण स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे अँथ्रानिलिक डायनामाइड्स (Anthranilic Diamides) आणि बेंझॉयलयुरिया (Benzoylureas) या दोन वेगवेगळ्या रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आंतरप्रवाही तसेच कीटकांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारे (IGR) कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कार्य करते. सायँट्रानिलिप्रोल किडींच्या स्नायू संस्थेवर परिणाम करून त्यांना अर्धांगवायू करते. तर लुफेन्युरॉन हे 'कायटीन' (Chitin) संश्लेषण रोखते, ज्यामुळे कीटकांची कात टाकण्याची प्रक्रिया विस्कळीत होते आणि अळीची पुढच्या अवस्थेत वाढ होत नाही.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.४ ते ०.५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ८० ते १०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ लष्करी अळी (Spodoptera)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिराकुस कडा (Diamond Back Moth - DBM)
    ▸ कोबीवरील अळी (Cabbage Caterpillar)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • बटाटा

    ▸ बटाटा पोखरणारी अळी (Potato Tuber Moth)
    ▸ मावा व तुडतुडे

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)
    ▸ लाल भुंगेरे (Red Pumpkin Beetle)

  • आले,हळद

    ▸ खोडकिडा (Shoot Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ नागअळी (Leaf Miner)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फळमाशी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
    ▸ नागअळी

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ मावा, तुडतुडे

  • गवार

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक कीड

  • कापूस

    ▸ बोंड अळी (Pink & American Bollworm)
    ▸ ठिपक्यांची बोंड अळी
    ▸ तुडतुडे, पांढरी माशी

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे (Thrips)

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे (Thrips)

  • सोयाबीन

    ▸ खोड माशी (Stem Fly)
    ▸ गर्डल बीटल (Chakrabring)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ पाणी गुंडाळणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ पाणी गुंडाळणारी अळी

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ शेंगा पोखरणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळमाशी
    ▸ पाने पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • भात

    ▸ खोडकिडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी

  • मका

    ▸ अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • ▸सर्वंकष नियंत्रण: हे प्रामुख्याने लष्करी अळी (Fall Armyworm), फळ पोखरणारी अळी आणि काही महत्त्वाच्या रसशोषक किडींवर एकाच वेळी उत्कृष्ट नियंत्रण देते.
    ▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींची अंडी नष्ट करते आणि अळीला कात टाकण्यापासून रोखते, ज्यामुळे किडींची पुढची पिढी तयार होत नाही.
    ▸दीर्घकालीन संरक्षण: याचा प्रभाव पिकावर दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे पिकाला जास्तीत जास्त दिवस संरक्षण मिळते.
    ▸पिकांसाठी सुरक्षित: शिफारसीनुसार वापरल्यास मका, कापूस आणि भाजीपाला पिकांवर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Minecto Xtra Group 28 आणि Group 15 चे मिश्रण आहे. प्रतिकारशक्ती टाळण्यासाठी एकाच गटातील औषधांचा वारंवार वापर करू नये.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. डोस कमी-जास्त केल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता असते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): रासायनिक फवारणीसोबतच कामगंध सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असू शकते, त्यामुळे फुलोरा अवस्थेत किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी करणे टाळावे.