Syngenta Cigna
Syngenta Cigna
Syngenta
Syngenta Cigna
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
पोटावाटे विष
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये लुफेन्युरॉन ५.४% ई.सी. (Lufenuron 5.4% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे इमल्सीफिएबल कन्सन्ट्रेट (Emulsifiable Concentrate) म्हणजेच तेलावर आधारित द्रावण स्वरूप आहे
-
रासायनिक गट
▸हे 'बेंझॉयल्युरिया' (Benzoylureas) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक 'कीटक वाढ नियंत्रक' (Insect Growth Regulator - IGR) प्रकारचे कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक प्रामुख्याने पोटावाटे विष (Stomach Action) म्हणून कार्य करते. जेव्हा अळ्या या औषधाची फवारणी झालेली पाने खातात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात प्रवेश करते. काही प्रमाणात हे स्पर्शजन्य (Contact Action) देखील आहे.
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या शरीरातील 'काइटिन' (Chitin) निर्मिती प्रक्रियेत अडथळा आणते. काइटिन हे कीटकांच्या बाह्य कवचासाठी आवश्यक असते. यामुळे अळ्यांना जुनी कात टाकून नवीन कात तयार करता येत नाही (Moulting Inhibition). परिणामी, अळ्यांची वाढ थांबते आणि त्यापुढील अवस्थेत न जाता मरतात.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : १.२ मिली ते १.५ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : २५० मिली ते ३०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ लष्करी अळी (Spodoptera)
▸ फुलकिडे (Thrips - काही प्रमाणात) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिरा पाठीवरील पतंग (DBM)
▸ पाने खाणारी अळी -
बटाटा
▸ बटाटा पोखरणारा पतंग
▸ पाने खाणारी अळी -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ पाने खाणारी अळी
▸ फळ पोखरणारी अळी -
आले,हळद
▸ पाने खाणारी अळी
-
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी (Helicoverpa)
▸ लष्करी अळी -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळ पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
▸ लष्करी अळी -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
▸ शेंडा पोखरणारी अळी -
गवार
▸ पाने खाणारी अळी
-
कापूस
▸ अमेरिकन बोंड अळी
▸ लष्करी अळी (Spodoptera) -
झेंडू
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
शेवंती
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
सोयाबीन
▸ पाने खाणारी अळी
▸ उंट अळी (Semilooper)
▸ लष्करी अळी -
भुईमूग
▸ पाने खाणारी अळी
▸ उंट अळी (Semilooper)
▸ लष्करी अळी -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ लष्करी अळी -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ लष्करी अळी -
हरभरा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ लष्करी अळी -
वाटाणा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ लष्करी अळी -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ पाने खाणारी अळी
▸ फळ पोखरणारी अळी -
भात
▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
-
गहू
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ खोड कीड -
मका
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ खोड कीड -
फ्रेंच बिन्स
▸ पाने खाणारी अळी
▸ शेंग पोखरणारी अळी
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸अळ्यांच्या नियंत्रणासाठी सर्वोत्तम: हे प्रामुख्याने लष्करी अळी, फळ पोखरणाऱ्या अळ्या आणि पाने खाणाऱ्या अळ्यांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींच्या अंड्यांवर देखील परिणाम करते, ज्यामुळे त्यातून अळ्या बाहेर पडत नाहीत.
▸दीर्घकालीन परिणाम: हे पानांवर दीर्घकाळ सक्रिय राहते, ज्यामुळे पिकाचे जास्त दिवस संरक्षण होते.
▸पावसाला प्रतिरोधक: फवारणीनंतर लवकर शोषले गेल्यामुळे पावसाचा यावर फारसा परिणाम होत नाही.
▸सुरक्षितता: हे मित्र कीटक आणि पर्यावरणासाठी तुलनेने सुरक्षित आहे (शिफारसीनुसार वापरल्यास).
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Syngenta Cigna हे Group 15 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. Spinyns किंवा Diamides) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे (Pheromone Traps) आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸फवारणीची वेळ: अळ्या लहान असतानाच (पहिली किंवा दुसरी अवस्था) फवारणी केल्यास सर्वोत्तम निकाल मिळतात.