Skip to product information
1 of 1

SWAL Viola

SWAL Viola

SWAL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

SWAL Viola

0
Size
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव SWAL 
उत्पादनाचे नाव Viola 
वापरण्याची पद्धत फवारणी,आळवणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Flupyrimin 10% SC.
रासायनिक गट Pyridylidenes
कीटकनाशक प्रकारआंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये फ्लुपायरीमीन १०% एस.सी. (Flupyrimin 10% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे 'पायरिडिलिडीन' (Pyridylidenes) या नवीन रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सवर (nAChR) अशा प्रकारे कार्य करते की ज्यामुळे कीटक अर्धांगवायू होऊन अन्न खाणे बंद करतात. ही कृती पारंपारिक औषधांपेक्षा वेगळी असल्याने प्रतिकारशक्ती असलेल्या किडींवरही हे प्रभावी ठरते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी, आळवणी (Drenching).

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.५ मिली ते २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ३०० मिली ते ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
    ▸ आळवणीचे प्रमाण: २ मिली प्रती लीटर पाणी.

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ तुडतुडे
    ▸मावा (Aphids)
    ▸फुलकिडे

  • बटाटा

    ▸तुडतुडे
    ▸मावा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ पांढरी माशी, तुडतुडे

  • आले,हळद

    ▸ थ्रिप्स

  • टोमॅटो

    पांढरी माशी, तुडतुडे

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स, पांढरी माशी

  • वांगे

    ▸ तुडतुडे
    ▸ पांढरी माशी

  • भेंडी

    तुडतुडे, मावा

  • गवार

    ▸ तुडतुडे

  • कापूस

    ▸ पांढरी माशी, तुडतुडे

  • झेंडू

    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ तुडतुडे
    ▸निळे भुंगेरे

  • भुईमूग

    ▸ तुडतुडे
    ▸निळे भुंगेरे

  • वाल घेवडा 

    ▸ तुडतुडे
    ▸ मावा

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ तुडतुडे
    ▸ मावा

  • हरभरा

    ▸ तुडतुडे

  • वाटाणा

    ▸ तुडतुडे

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ थ्रिप्स
    ▸ पांढरी माशी

  • भात

    ▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
    ▸ हिरवे तुडतुडे

  • गहू

    ▸ तुडतुडे

  • मका

    ▸ तुडतुडे

  • फ्रेंच बिन्स

    ▸ थ्रिप्स
    ▸ तुडतुडे


  • ▸तुडतुड्यांवर हुकुमी नियंत्रण: हे विशेषतः भात पिकावरील तपकिरी तुडतुडे (BPH) आणि हिरवे तुडतुडे यांच्यावर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
    ▸दीर्घकालीन संरक्षण: याच्या आंतरप्रवाही गुणामुळे हे पिकाला प्रदीर्घ काळासाठी कीडमुक्त ठेवते.
    ▸नवीन तंत्रज्ञान: हे औषध अशा किडींवरही प्रभावी आहे ज्यांच्यामध्ये जुन्या कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.
    ▸पिकाची सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकाच्या वाढीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: भात पिकाव्यतिरिक्त हे इतर महत्त्वाच्या नगदी पिकांवरील रसशोषक किडींसाठी वापरले जाते.


  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): SWAL Viola हे Group 4E गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता प्रकाश सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त १ ते २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि इतर मित्र कीटकांना (शिफारसीनुसार वापरल्यास) सुरक्षित मानले जाते, तरीही फुलोरा अवस्थेत काळजी घ्यावी.