Sumitomo Borneo
Sumitomo Borneo
Sumitomo
Sumitomo Borneo
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
स्पर्शजन्य +
आंतरप्रवाही
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये इटाक्झाझोल १०% एस.सी. (Etoxazole 10% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पाण्यात मिसळणारे दाट द्रावण स्वरूप (Suspension Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे 'डिपेनिल ऑक्साझोलिन' (Diphenyl oxazoline) या रासायनिक गटातील कीटकनाशक (कोळीनाशक) आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही गुणधर्म असलेले 'कोळीनाशक' आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे औषध फवारणीनंतर कोळी (Mites) किंवा त्यांच्या अंड्यांच्या थेट संपर्कात आल्यास प्रभावी ठरते (Contact Action). तसेच यात पारपटल (Translaminar) गुणधर्म असल्याने पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या कोळी व त्यांच्या अंड्यांपर्यंत सहज पोहोचते.
-
कार्यपद्धती
▸हे कोळीच्या वाढीच्या प्रक्रियेवर (Mite Growth Regulator) परिणाम करते. हे कोळीमधील कात टाकण्याच्या प्रक्रियेला (Chitin synthesis) रोखते. यामुळे अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाहीत आणि कोळीच्या लहान अवस्थांची वाढ खुंटून त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.८ मिली ते १ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : १६० मिली ते २०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ लाल कोळी (Red Spider Mites)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ कोळी (Mites)
-
बटाटा
▸ कोळी (Mites)
▸ पांढरा कोळी -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ लाल कोळी (Red Spider Mite)
▸ पिवळा कोळी (Yellow Mite) -
आले,हळद
▸ कोळी (Mites)
-
टोमॅटो
▸ लाल कोळी (Two-spotted Spider Mite)
-
मिरची,ढोबळी मिरची
▸ पिवळा कोळी (Yellow Mite)
▸ लाल कोळी -
वांगे
▸ दोन ठिपक्यांचा लाल कोळी (Two-spotted Mite)
-
भेंडी
▸ लाल कोळी (Red Spider Mite)
-
गवार
▸ कोळी (Mites)
-
कापूस
▸ लाल कोळी (Red Spider Mite)
-
झेंडू
▸ लाल कोळी (Mites)
-
शेवंती
▸ लाल कोळी (Mites)
-
सोयाबीन
▸ लाल कोळी (Mites)
-
भुईमूग
▸ लाल कोळी (Mites)
-
वाल घेवडा
▸ कोळी (Mites)
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ कोळी (Mites)
-
हरभरा
▸ कोळी (Mites)
-
वाटाणा
▸ कोळी (Mites)
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ लाल कोळी (Red Spider Mites)
-
भात
▸ कोळी (Mites)
-
गहू
▸ कोळी (Mites)
-
मका
▸ कोळी (Mites)
-
फ्रेंच बिन्स
▸ लाल कोळी (Red Spider Mites)
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸कोळीच्या सर्व अवस्थांवर नियंत्रण: हे प्रामुख्याने तांबडा कोळी (Red Spider Mite), पिवळा कोळी यांसारख्या विविध प्रकारच्या कोळींवर प्रभावी आहे.
▸अंडीनाशक क्षमता: याची सर्वात मोठी विशेषत: म्हणजे हे कोळीची अंडी, अळ्या आणि कोवळ्या अवस्थांना प्रभावीपणे नष्ट करते.
▸दीर्घकालीन परिणाम: एकदा फवारणी केल्यावर हे पिकाला प्रदीर्घ काळासाठी (जवळपास २० ते २५ दिवस) कोळीपासून संरक्षण देते.
▸पावसाचा परिणाम कमी: हे पानांच्या पृष्ठभागावर चांगले चिकटून राहते, त्यामुळे फवारणीनंतर पाऊस आल्यास याचे परिणाम कमी होत नाहीत.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Sumitomo Borneo हे IRAC Group 10B गटातील आहे. कोळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कोळीनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील औषध वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कोळीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि कोळीग्रस्त फांद्या नष्ट करण्यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाची जास्तीत जास्त १ ते २ वेळाच फवारणी करावी.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध कोळी खाणाऱ्या मित्र कीटकांना (Predatory mites) सुरक्षित मानले जाते, ज्यामुळे निसर्गाचे संतुलन राखले जाते.