Sixer + Areva + Humic Acid Drenching kit

Sixer + Areva + Humic Acid Drenching kit

Farmspot Shop

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Sixer + Areva + Humic Acid Drenching kit

0
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Dhanuka
किट नाव Sixer +Areva +Humic Acid
वापरण्याची पद्धत आळवणी

घटक माहिती

Composition Details

Sixer   Carbendazim 12% +
Mancozeb 63% WP
Areva  Thiamethoxam 25% WG
Humic Acid Potassium Humate 98%

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Sixer: यामध्ये कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Areva: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Humic Acid: यामध्ये ह्युमिक ॲसिड (९८% किंवा ९५%) हा सेंद्रिय घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब : बेंझिमिडाझोल + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Sixer हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Areva हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Sixer (Carbendazim 12% + Mancozeb 63% WP) :
    आळवणीद्वारे वापरल्यानंतर यातील 'कार्बेन्डाझिम' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने झाडामध्ये पसरतो व बुरशीच्या पेशी विभाजनावर परिणाम करून तिची वाढ थांबवतो. 'मॅन्कोझेब' हा संपर्कजन्य (Contact) घटक मुळांच्या भोवती संरक्षक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. हे प्रामुख्याने मर, मुळकुज आणि करपा यांसारख्या रोगांवर दुहेरी संरक्षण देते.

    ▸ Areva (Thiamethoxam 25% WG) :
    हे एक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक असून आळवणीद्वारे वापरल्यानंतर मुळांद्वारे शोषले जाते व संपूर्ण झाडामध्ये पसरते. 'थियामेथोक्झाम' हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करून कीटकांची संदेशवहन यंत्रणा विस्कळीत करतो. यामुळे कीटक खाणे बंद करतात, त्यांची हालचाल कमी होते व शेवटी त्यांचा मृत्यू होतो.

    ▸ Humic Acid (Potassium Humate 98%) :
    हे सेंद्रिय जैव-उत्तेजक असून जमिनीचा पोत सुधारण्याचे काम करते. आळवणीनंतर हे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे झाड जमिनीतील खते आणि पाणी अधिक वेगाने शोषू शकते. हे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीला चालना देते आणि झाडाला प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शक्ती प्रदान करते, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Sixer: 2 ते 2.5 ग्रॅम
    ▸ Areva: 0.5 ग्रॅम
    ▸ Humic Acid: 1 ते 2 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Sixer: 30 ते 37 ग्रॅम
    ▸ Areva: 7.5 ग्रॅम
    ▸ Humic Acid: 15 ते 30 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Sixer: 400 ते 500 ग्रॅम
    ▸ Areva: 100 ग्रॅम
    ▸ Humic Acid: 400 ते 500 ग्रॅम

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    ▸  यामधील Sixer या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Areva या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामध्ये Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Sixer या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Areva या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे  उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Humic Acid

  • 2. Dhanuka Sixer

  • 3. Dhanuka Areva