N21 + 14:48:00 + Biozyme Drip Drenching kit
N21 + 14:48:00 + Biozyme Drip Drenching kit
Farmspot Shop
N21 + 14:48:00 + Biozyme Drip Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
Premium Crop Protection Kit
Farmspot Special Kit
किट माहिती
Kit Details
+ Biozyme Drip
घटक माहिती
Composition Details
Nitrogen
48% Phosphorus
Acids
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ N21: यामध्ये २१% अमोनियम नायट्रोजन हा नत्र खताचा घटक असतो.
▸ 14:48:00: यामध्ये १४% नत्र आणि ४८% स्फुरद हे पाण्यात विरघळणारे खत घटक असतात.
▸ Biozyme Drip: यामध्ये समुद्री शेवाळ , ह्युमिक आणि अमिनो ॲसिडचा अर्क असलेला जैव-उत्तेजक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ N21 : नत्रयुक्त अमोनियम गट (अमोनिअम सल्फेट आधारित).
▸ 14:48:00 : मुख्य अन्नद्रव्ये (नत्र + उच्च स्फुरद) - स्टार्टर ग्रेड.
▸ Biozyme Drip : नैसर्गिक वनस्पती संप्रेरके आणि सेंद्रिय उत्तेजक (Biostimulant). -
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
▸ N21 (Ammonium Sulphate - 21% Nitrogen, 24% Sulphur) :
हे खत प्रामुख्याने नत्र (Nitrogen) आणि गंधक (Sulphur) पुरवण्यासाठी वापरले जाते. आळवणीद्वारे दिल्यास यातील अमोनिकल नत्रामुळे झाडाला सतत ऊर्जा मिळते आणि गंधकामुळे जमिनीचा सामू (pH) नियंत्रित राहण्यास मदत होते. हे पिकामद्धे प्रथिने तयार करण्यास आणि पिकाला गडद हिरवा रंग देण्यास अत्यंत उपयुक्त ठरते.
▸ 14:48:00 (High Phosphorus Fertilizer) :
हे एक उच्च स्फुरद (Phosphorus) युक्त विद्रव्य खत आहे. आळवणी किंवा ठिबकद्वारे दिल्यानंतर हे मुळांच्या कक्षेमध्ये कार्य करते, ज्यामुळे मुळांचा विकास वेगाने होतो आणि रोपांचा पाया मजबूत होतो. यातील नत्र शाखीय वाढीला मदत करतो, तर स्फुरद रोपांना फुटवे काढण्यासाठी आणि कळीची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो.
▸ Biozyme (Biostimulant) :
बायोझाईम हे नैसर्गिकरीत्या तयार केलेले जैविक उत्तेजक आहे. यामध्ये सागरी शेवाळाचा अर्क (Seaweed Extract), संप्रेरके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. हे झाडाच्या चयापचय क्रियेला वेग देते, ज्यामुळे पिके जमिनीतील खते अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकते. हे पिकाला विविध ताणांपासून वाचवते आणि फुलांची व फळांची गळ रोखून उत्पादनात वाढ करण्यास मदत करते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ N21 : 6 ग्रॅम
▸ 14:48:00: 6 ग्रॅम
▸ Biozyme Drip: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ N21 : 90 ग्रॅम
▸ 14:48:00: 90 ग्रॅम
▸ Biozyme Drip: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ N21: 1.2 किलो
▸ 14:48:00: 1.2 किलो
▸ Biozyme Drip: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸ N : 21 या खतांचा वापर आळवणी मध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर वाढ होते व रोपांना नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने हिरवीगार होतात व आतून तेलकट होतात.
▸ 14:48:00 या खतांचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते खोड जाड होते, नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते.
▸ Biozyme Drip याचा वापर केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची निर्मिती होते, पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात.
-
आले/हळद
▸ N : 21 या खतांचा वापर आळवणी मध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर वाढ होते व रोपांना नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने हिरवीगार होतात व आतून तेलकट होतात.
▸ 14:48:00 या खतांचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते खोड जाड होते, नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते.
▸ Biozyme Drip याचा वापर केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची निर्मिती होते, पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. 14:48:00
-
2. N21
-
3. Biostadt Biozyme Drip
-