Movento OD 250 ml + Vayego 100 ml Spray Kit

Movento OD 250 ml + Vayego 100 ml Spray Kit

Farmspot Shop

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Movento OD 250 ml + Vayego 100 ml Spray Kit

0
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक    Bayer
किट नाव Movento OD + Vayego 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Movento OD Spirotetramat
15.31% w/w OD
Vayego  Tetraniliprole 18.18% SC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Movento OD: यामध्ये स्पायरोटेट्रामॅट १५.३१% डब्लू/डब्लू ओडी हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Vayego: यामध्ये टेट्रानिलीप्रोल १८.१८% डब्लू/डब्लू एससी हा कीटकनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ स्पायरोटेट्रामॅट : टेट्रॅमिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह्ज गट.
    ▸ टेट्रानिलीप्रोल : डायमाइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Movento OD हे 'टू-वे सिस्टेमिक' (Two-way Systemic) कीटकनाशक आहे.
    ▸ Vayego हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Movento OD (Spirotetramat 15.31% w/w OD) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक पानांद्वारे शोषले जाऊन द्विमार्गी प्रणालीगत (Two-way Systemic) पद्धतीने कार्य करते, म्हणजेच झाडाच्या वरच्या व खालच्या भागात (Xylem व Phloem) दोन्ही दिशेने पसरते. Spirotetramat हा लिपिड बायोसिंथेसिस इनहिबिटर (Lipid Biosynthesis Inhibitor) गटातील घटक असून कीटकांच्या शरीरातील चरबी निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे कीटकांची वाढ व विकास थांबतो, अपूर्ण अवस्थेतील कीटक (निंफ) विकसित होत नाहीत व हळूहळू त्यांचा मृत्यू होतो. हे विशेषतः रस शोषणाऱ्या कीटकांवर प्रभावी आहे.

    ▸ Vayego (Tetraniliprole 18.18% SC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे अळीच्या शरीरात प्रवेश करते तसेच ट्रान्सलॅमिनार क्रिया दर्शवते. Tetraniliprole हा डायमाइड गटातील घटक असून कीटकांच्या स्नायू पेशींतील Ryanodine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कॅल्शियम आयनचे अनियंत्रित स्त्रवण होते, स्नायू सतत आकुंचन पावतात, अळीची हालचाल व खाणे त्वरित थांबते. काही वेळात अळी निष्क्रिय होऊन मरते.
    या संयुक्त क्रियेने रस शोषणारे व अळीवर्गीय कीटक दोन्ही प्रभावीपणे नियंत्रणात येतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Movento OD: 1 मिली
    ▸ Vayego: 0.5 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Movento OD: 15 मिली
    ▸ Vayego: 7.5 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Movento OD: 200 मिली
    ▸ Vayego: 100 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • 1. Bayer Movento OD

  • 2. Bayer Vayego

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.