Meothrin 250 ml + Mitigate 500 ml Spray Kit

Meothrin 250 ml + Mitigate 500 ml Spray Kit

Farmspot Shop

Regular price Rs. 1,046.00 INR
Regular price Sale price Rs. 1,046.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Meothrin 250 ml + Mitigate 500 ml Spray Kit

1046
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Sumitomo + Jivagro
किट नाव Meothrin + Mitigate 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Meothrin  Fenpropathrin 30% EC
Mitigate  Fenpyroximate 5% EC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Meothrin: यामध्ये फेनप्रोपॅथ्रिन ३०% ईसी हा कीटकनाशक व कोळीनाशक घटक असतो.
    ▸ Mitigate: यामध्ये फेनपायरॉक्सिमेट ५% एससी हा कोळीनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ फेनप्रोपॅथ्रिन : सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.
    ▸ फेनपायरॉक्सिमेट : पायराझोल गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Meothrin हे संपर्कजन्य व निवारक कीटकनाशक आहे.
    ▸ Mitigate हे संपर्कजन्य व स्पर्शजन्य कोळीनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Meothrin (Fenpropathrin 30% EC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते. Fenpropathrin हा सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन अनियंत्रित होते, कीटक अतिउत्तेजित होतो, त्याला कंप व लकवा येतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. हे चावणारे व रस शोषणारे कीटक तसेच काही प्रमाणात माइट्सवर त्वरित प्रभाव दाखवते.

    ▸ Mitigate (Fenpyroximate 5% EC) :
    फवारणीनंतर हे अॅकारिसाइड (Mite control) स्पर्शाद्वारे माइट्सच्या शरीरात प्रवेश करते. Fenpyroximate हा माइट्सच्या पेशींतील माइटोकॉन्ड्रियामधील इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट साखळीतील Complex-I (NADH dehydrogenase) वर परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते, माइट्सची हालचाल कमी होते व काही वेळात ते निष्क्रिय होऊन मरतात.
    हे विशेषतः लाल कोळी (Red mites) व इतर माइट्सच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयोगी आहे.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Meothrin: 1 मिली
    ▸ Mitigate: 1 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Meothrin: 15 मिली
    ▸ Mitigate: 15 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Meothrin: 200 मिली
    ▸ Mitigate: 200 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • 1. Sumitomo Meothrin

  • 2. Mitigate Jivagro

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.