Matco + Hamla 550+ Humic Acid Drenching kit

Matco + Hamla 550+ Humic Acid Drenching kit

Farmspot Shop

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Matco + Hamla 550+ Humic Acid Drenching kit

0
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Indofil +Gharda  
किट नाव Matco + Hamla 550+
Humic Acid
वापरण्याची पद्धत आळवणी

घटक माहिती

Composition Details

Matco   Metalaxyl 8%+
Mancozeb 64%WP
Hamla 550 Chlorpyriphos 50%+
Cypermethrin 5% EC.
Humic Acid Potassium Humate 98%

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Matco: यामध्ये मेटालॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Hamla 550: यामध्ये क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ईसी हे कीटकनाशक घटक असतात.
    ▸ Humic Acid: यामध्ये ह्युमिक ॲसिड (९८% किंवा ९५%) हा सेंद्रिय घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ मेटालॅक्झिल + मॅन्कोझेब : असाईलअलॅनाइन + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रिन : ऑरगॅनोफॉस्फरस + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Matco हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Hamla 550 हे स्पर्शजन्य, पोटातून आणि बाष्पशील पद्धतीने काम करणारे कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Matco (Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP) :
    आळवणीद्वारे वापरल्यानंतर 'मेटॅलॅक्सिल' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो. 'मॅन्कोझेब' हा संपर्कजन्य (Contact) घटक मुळांच्या आसपासच्या भागात संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. हे प्रामुख्याने जमिनीतील बुरशीमुळे होणाऱ्या मर आणि मुळकुज रोगावर प्रभावी आहे.

    ▸ Hamla 550 (Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC) :
    हे दोन घटकांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे. 'क्लोरोपायरीफॉस' हा घटक प्रामुख्याने धुरीजन्य (Fumigant) आणि संपर्कजन्य पद्धतीने काम करून जमिनीतील हुमणी, वाळवी व इतर हानिकारक कीटकांचा नायनाट करतो. 'सायपरमेथ्रिन' हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर त्वरित परिणाम करून त्यांना अर्धांगवायू करते. आळवणीद्वारे दिल्यास हे मुळांना कुरतडणाऱ्या कीटकांविरुद्ध तत्काळ आणि प्रभावी संरक्षण देते.

    ▸ Humic Acid (Potassium Humate 98%) :
    हे सेंद्रिय जैव-उत्तेजक असून जमिनीचा पोत सुधारण्याचे काम करते. आळवणीनंतर हे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे झाड जमिनीतील खते आणि पाणी अधिक वेगाने शोषू शकते. हे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीला चालना देते आणि झाडाला प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शक्ती प्रदान करते, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Matco: 2 ते 2.5 ग्रॅम
    ▸ Hamla 550: 1.5 ते 2 मिली
    ▸ Humic Acid: 1 ते 2 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Matco: 30 ते 37 ग्रॅम
    ▸ Hamla 550: 22 ते 30 मिली
    ▸ Humic Acid: 15 ते 30 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Matco: 400 ते 500 ग्रॅम
    ▸ Hamla 550: 300 ते 400 मिली
    ▸ Humic Acid: 400 ते 500 ग्रॅम

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    ▸ यामधील Matco या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Hamla 550 या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे  उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Matco या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Hamla 550 या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे  उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Humic Acid

  • 2. Indofil Matco

  • 3. Gharda Hamla 550