Infinito + Plesiva Spray Kit
Infinito + Plesiva Spray Kit
Farmspot
Infinito + Plesiva Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Infinito: यामध्ये फ्ल्यूपिकोलाइड ५.५६% + प्रोपॅमोकार्ब हायड्रोक्लोराइड ५५.६% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Plesiva: यामध्ये सायनिट्रानिलीप्रोल ७.३% + डायफेनथ्र्युरॉन २७.१% एससी हे कीटकनाशक घटक असतात. -
रासायनिक गट
▸ फ्ल्यूपिकोलाइड + प्रोपॅमोकार्ब : बेंझामाइड + कार्बामाेट गट.
▸ सायनिट्रानिलीप्रोल + डायफेनथ्र्युरॉन :डायमाइड + थायोयुरिया गट. -
उत्पादन प्रकार
▸ Infinito हे आंतरप्रवाही + स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Plesiva हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि बाष्पशील कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Infinito (Fluopicolide 5.56% + Propamocarb Hydrochloride 55.6% SC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे बुरशीनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) व ट्रान्सलॅमिनार पद्धतीने कार्य करते.
Fluopicolide हा बुरशीच्या पेशींच्या संरचनेवर परिणाम करणारा घटक असून पेशींच्या साइटोस्केलेटन व झिल्लीच्या स्थैर्यावर परिणाम करतो. त्यामुळे बुरशीची वाढ व प्रसार थांबतो.
Propamocarb Hydrochloride हा कार्बामेट गटातील प्रणालीगत बुरशीनाशक असून बुरशीच्या पेशीभित्ती निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे मायसेलियमची वाढ थांबते.
▸ Plesiva (Cyantraniliprole 7.3% w/w + Diafenthiuron 36.4% w/w SC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच ट्रान्सलॅमिनार क्रिया दर्शवते.
Cyantraniliprole हा डायमाइड गटातील घटक असून कीटकांच्या स्नायू पेशींतील Ryanodine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कॅल्शियम आयनचे अनियंत्रित स्त्रवण होते, अळी खाणे बंद करते व निष्क्रिय होते.
Diafenthiuron हा कीटकांच्या माइटोकॉन्ड्रियातील श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा निर्मिती कमी होते व कीटकाची हालचाल थांबते.
या संयुक्त क्रियेने अळीवर्गीय तसेच रस शोषणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Infinito: 2.5 ते 3 मिली
▸ Plesiva: 1.25 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Infinito: 37.5 ते 45 मिली
▸ Plesiva: 15 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Infinito: 500 ते 600 मिली
▸ Plesiva: 200 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ यामधील बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ यामधील बुरशीनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
बटाटा
▸ यामधील बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, जासिड थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच लहान अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ यामधील बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
आले,हळद
▸ यामधील बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, पाने गुंडाळणारी अळी तसेच लहान अवस्थेतील अळी गटातील खोड पोखरणारी अळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
टोमॅटो
▸ यामधील बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खणारी अळी,फळ पोखरणारी अळी तसेच लहान अवस्थेतील अळी ,नागअळी,टुटा नागअळी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ यामधील बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ पोखरणारी अळी तसेच लहान अवस्थेतील अळी पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वांगे
▸ यामधील बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा,जासिड, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर तसेच लहान अळीवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भेंडी
▸ यामधील बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा,जासिड,तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी, लहान अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गवार
▸ यामधील बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी तसेच लहान अवस्थेतील अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कापूस
▸ यामधील बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच बोंडअळी, तसेच लहान अवस्थेतील अळी पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
झेंडू
▸ यामधील बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच लहान अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
शेवंती
▸ यामधील बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच लहान अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
सोयाबीन
▸ यामधील बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) तसेच लहान अवस्थेतील अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भुईमूग
▸ यामधील बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी तसेच लहान अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाल घेवडा
▸ यामधील बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी तसेच लहान अवस्थेतील अळी गटातील इतर किडींवर (सुरुवातीची अळी) प्रभावी नियंत्रण मिळते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ यामधील बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, थ्रिप्स तसेच लहान अळी यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
हरभरा
▸ यामधील बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पोढा अळी (Helicoverpa) तसेच लहान अवस्थेतील अळी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाटाणा
▸ यामधील बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच लहान अळी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ यामधील बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच लहान अळी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भात
▸ यामधील बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (Leaf Hopper), जासिड, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer) व पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच लहान अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गहू
▸ यामधील बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, जासिड, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मका
▸ यामधील बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, जासिड, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर तसेच लहान अळीवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
फ्रेंच बिन्स
▸ यामधील बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी, लहान अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Bayer Infinito
-
2. Syngenta Plesiva
-