Folio Gold + Voliam Flexi + Isabion Drenching kit
Folio Gold + Voliam Flexi + Isabion Drenching kit
Farmspot Shop
Folio Gold + Voliam Flexi + Isabion Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Isabion
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
Thiamethoxam 17.50% w/w SC
free amino acids.
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटालॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Voliam Flexi: यामध्ये क्लोरँट्रानिलीप्रोल ८.८०% + थायामेथोक्साम १७.५०% एससी हे कीटकनाशक घटक असतात.
▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड आणि पोषक तत्वांचे मिश्रण (Amino Acids + Nutrients) हा नैसर्गिक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ मेटालॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : फिनाईलअमाइड + क्लोरोनिट्रिल गट.
▸ क्लोरँट्रानिलीप्रोल + थायामेथोक्साम :डायमाइड + निओनिकोटिनॉइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Voliam Flexi हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
आळवणीनंतर यातील 'मेटॅलॅक्सिल-एम' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने झाडामध्ये पसरतो व बुरशीच्या RNA संश्लेषणावर परिणाम करतो. 'क्लोरोथॅलोनिल' हा संपर्कजन्य (Contact) घटक मुळांच्या भोवती संरक्षणात्मक थर तयार करून बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. हे प्रामुख्याने मुळकुज आणि मर रोगासाठी कारणीभूत असलेल्या बुरशीची वाढ रोखते.
▸ Voliam Flexi (Chlorantraniliprole 8.80% + Thiamethoxam 17.50% SC) :
आळवणीद्वारे दिल्यानंतर हे कीटकनाशक मुळांतून शोषले जाते आणि झाडाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. यातील 'रिनाक्सिपायर' अळीच्या स्नायूंमधील कॅल्शियम सोडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करून त्यांना लुळे पाडते, तर 'थियामेथोक्झाम' रसशोषक कीटकांच्या मज्जासंस्थेवर (nAChR) हल्ला करते. यामुळे कीटक खाणे बंद करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.
▸ Isabion (Peptides + Free Amino Acids) :
हे नैसर्गिक अमिनो आम्ल आणि पेप्टाइड्सयुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) आहे. आळवणीनंतर मुळांद्वारे शोषले जाऊन हे झाडाच्या चयापचय प्रक्रियेला वेग देते. हे प्रामुख्याने पांढऱ्या मुळांचा विस्तार वाढवते, झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हवामानातील बदलांमुळे येणारा ताण कमी करून पिकाची जोमदार वाढ करते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Voliam Flexi: 1 मिली
▸ Isabion: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Voliam Flexi: 15 मिली
▸ Isabion: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Voliam Flexi: 200 मिली
▸ Isabion: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸यामधील FolioGold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम, फ्युजारीयम या जमिनीमधून पसरणाऱ्या बुरशीमुळे रोपमर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच पुढील 10 ते 15 दिवसात नव्याने रोपांची मर होत नाही.
▸यामधील VoliamFlexi या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे या रसशोषक किडींवर त्याचबरोबर नागअळी, काळी कुरतडणारी अळी, हुमणी,भुंगेरे किडे या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या पोषक उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत होते रोपांच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸या अळवणी किट चा वापर केल्यामुळे यामधील उत्पादनाचा फायटोटॉनिक परिणामामुळे रोपांच्या मुळांची खोलवर वाढ होते व पुढे जाऊन रूट कॉईलिंगची येणारी अडचण येत नाही. -
आले/हळद
▸कंद उगवणीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम फ्युजारीयम या जमिनीमधून पसरणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कुज, उगवून आलेले कोंब मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामधील FolioGold चा वापर केल्यामुळे या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मर रोगावर नियंत्रण मिळते.
▸यामधील VoliamFlexi चा वापर केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या व पानांचे नुकसान करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. तसेच जमिनीमधील येणाऱ्या काळी कुरतडणारी अळी, हुमणी, वाळवी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion चा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते.कोंब जमिनी बाहेर आल्यावर त्यावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो.
▸या आळवणी किटचा वापर केल्यामुळे बुरशीजन्य रोग, किडी यावर नियंत्रण मिळण्याबरोबर रोपांवर आलेलाजैविक व अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta FolioGold
-
2. Syngenta Voliam Flexi
-
3. Syngenta Isabion
-