Folio Gold + Slayer Pro+ Isabion Drenching kit
Folio Gold + Slayer Pro+ Isabion Drenching kit
Farmspot Shop
Folio Gold + Slayer Pro+ Isabion Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Isabion
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
free amino acids.
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटालॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Slayer Pro: यामध्ये थायामेथोक्साम ३०% एफएस हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड आणि पोषक तत्वांचे मिश्रण (Amino Acids + Nutrients) हा नैसर्गिक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ मेटालॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : फिनाईलअमाइड + क्लोरोनिट्रिल गट.
▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Slayer Pro हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
आळवणीनंतर यातील 'मेटॅलॅक्सिल-एम' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने झाडामध्ये पसरतो व बुरशीच्या RNA संश्लेषणावर परिणाम करतो. 'क्लोरोथॅलोनिल' हा संपर्कजन्य (Contact) घटक मुळांच्या भोवती संरक्षणात्मक थर तयार करून बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. हे प्रामुख्याने मुळकुज आणि मर रोगासाठी कारणीभूत असलेल्या बुरशीची वाढ रोखते.
▸ Slayer Pro (Thiamethoxam 30% FS) :
हे उच्च एकाग्रता असलेले कीटकनाशक असून आळवणीनंतर मुळांद्वारे वेगाने शोषले जाते आणि प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. 'थियामेथोक्झाम' हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेतील रिसीप्टर्सवर परिणाम करतो, ज्यामुळे कीटक खाणे बंद करतात. हे प्रामुख्याने जमिनीतील हुमणी, वाळवी आणि सुरुवातीच्या काळातील रसशोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे.
▸ Isabion (Peptides + Free Amino Acids) :
हे नैसर्गिक अमिनो आम्ल आणि पेप्टाइड्सयुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) आहे. आळवणीनंतर मुळांद्वारे शोषले जाऊन हे झाडाच्या प्रथिनांच्या निर्मितीला आणि चयापचय प्रक्रियेला वेग देते. हे पांढऱ्या मुळांची वाढ सुधारते, पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि प्रतिकूल हवामानामुळे येणारा ताण कमी करून झाडाची जोमदार वाढ करते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Slayer Pro: 0.5 ते 1 मिली
▸ Isabion: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Slayer Pro: 7.5 ते 15 मिली
▸ Isabion: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Slayer Pro: 100 ते 200 मिली
▸ Isabion: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Slayer Pro या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामध्ये Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. -
आले/हळद
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Slayer Pro या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामधील Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. GSP Slayer Pro
-
2. Syngenta FolioGold
-
3. Syngenta Isabion
-