Folio Gold + Plesiva Spray Kit
Folio Gold + Plesiva Spray Kit
Farmspot
Folio Gold + Plesiva Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
Diafenthiuron 36.4% SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटलॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Plesiva: यामध्ये सायनिट्रानिलीप्रोल ७.३% + डायफेनथ्र्युरॉन २७.१% एससी हे कीटकनाशक घटक असतात. -
रासायनिक गट
▸ मेटलॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : अॅसिलॅलानाइन + क्लोरोनिट्रिल गट.
▸ सायनिट्रानिलीप्रोल + डायफेनथ्र्युरॉन :डायमाइड + थायोयुरिया गट. -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Plesiva हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य आणि बाष्पशील कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Chlorothalonil हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रियेत अडथळा आणतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
या संयुक्त क्रियेने डाऊनी मिल्ड्यू, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
▸ Plesiva (Cyantraniliprole 7.3% w/w + Diafenthiuron 36.4% w/w SC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच ट्रान्सलॅमिनार क्रिया दर्शवते.
Cyantraniliprole हा डायमाइड गटातील घटक असून कीटकांच्या स्नायू पेशींतील Ryanodine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कॅल्शियम आयनचे अनियंत्रित स्त्रवण होते, अळी खाणे बंद करते व निष्क्रिय होते.
Diafenthiuron हा कीटकांच्या माइटोकॉन्ड्रियातील श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा निर्मिती कमी होते व कीटकाची हालचाल थांबते.
या संयुक्त क्रियेने अळीवर्गीय तसेच रस शोषणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Plesiva: 1.25 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Plesiva: 15 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Plesiva: 200 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
बटाटा
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
आले,हळद
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
टोमॅटो
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खणारी अळी,फळ पोखरणारी अळी,नागअळी,टुटा नागअळी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वांगे
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भेंडी
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गवार
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कापूस
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच बोंडअळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
झेंडू
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
शेवंती
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलांवर व पानांवर नुकसान करणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
सोयाबीन
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भुईमूग
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाल घेवडा
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
हरभरा
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पोढा अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाटाणा
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मका
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta FolioGold
-
2. Syngenta Plesiva
-