Folio Gold + Belt Expert + Ambition Drenching kit
Folio Gold + Belt Expert + Ambition Drenching kit
Farmspot Shop
Folio Gold + Belt Expert + Ambition Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Ambition
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
Thiacloprid 19.92% w/w SC
fulvic acid +
micro element
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटालॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Belt Expert: यामध्ये फ्ल्युबेंडियामाइड १९.९२% + थायाक्लोप्रिड १९.९२% डब्ल्यू/डब्ल्यू एससी हे कीटकनाशक घटक असतात.
▸ Ambition: यामध्ये अमिनो ॲसिड, फल्व्हिक ॲसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे घटक असतात. -
रासायनिक गट
▸ मेटालॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : फिनाईलअमाइड + क्लोरोनिट्रिल गट.
▸ फ्ल्युबेंडियामाइड + थायाक्लोप्रिड : डायमाइड + निओनिकोटिनॉइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Belt Expert हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
फोलिओ गोल्ड आळवणीनंतर यातील 'मेटॅलॅक्सिल-एम' हे घटक प्रणालीगत (Systemic) पद्धतीने मुळांद्वारे शोषले जाऊन झाडाच्या आतून संरक्षण देते, तर 'क्लोरोथॅलोनिल' हे संपर्कजन्य (Contact) पद्धतीने मुळांच्या भोवती एक संरक्षक कवच तयार करते. हे प्रामुख्याने फायटोप्थोरा (Phytophthora) आणि पायरियम (Pythium) सारख्या बुरशीमुळे होणारी मुळकुज आणि मर रोगावर नियंत्रण मिळवते.
▸ Belt Expert (Flubendiamide 19.92% + Thiacloprid 19.92% SC) :
हे एक आधुनिक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे. यातील 'फ्लुबेंडियामाईड' हे अळीवर्गीय कीटकांच्या स्नायूंवर परिणाम करून त्यांना लुळे पाडते, तर 'थियाक्लोप्रिड' हे निओनिकोटिनॉईड गटातील असून ते रसशोषक कीटकांच्या मज्जासंस्थेवर काम करते. आळवणीद्वारे दिल्यास हे मुळांना कुरतडणाऱ्या अळ्या आणि सुरुवातीच्या काळातील खोडकिडा किंवा रसशोषक कीटकांचा बंदोबस्त करते.
▸ Ambition (Amino Acids + Fulvic Acid + Micro Elements) :
अँबिशन्स हे बायर कंपनीचे प्रगत जैव-उत्तेजक (Bio-stimulant) आहे.
अमिनो ॲसिड: झाडाच्या पेशींची निर्मिती आणि प्रथिनांचे संश्लेषण वाढवते.
फुलविक ॲसिड: मुळांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता (Cation Exchange Capacity) वाढवते.
सूक्ष्म अन्नद्रव्ये: झाडाचे पोषण संतुलन राखण्यास मदत करतात.
हे उत्पादन झाडाला कोणत्याही हवामानातील ताणतणावातून (Abiotic Stress) बाहेर काढण्यासाठी आणि मुळांची जोमदार वाढ करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Belt Expert: 0.5 मिली
▸ Ambition: 2 ते 3 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Belt Expert: 7.5 मिली
▸ Ambition: 30 ते 45 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Belt Expert: 100 मिली
▸ Ambition: 400 ते 600 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Belt Expert या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामध्ये Ambition उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. -
आले/हळद
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Belt Expert या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामधील Ambition उत्पादनाचा वापर केल्यामुळे उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta FolioGold
-
2. Bayer Belt Expert
-
3. Bayer Ambition
-