Folio Gold + Areva + Isabion Drenching kit
Folio Gold + Areva + Isabion Drenching kit
Farmspot Shop
Folio Gold + Areva + Isabion Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Syngenta
Isabion
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil 33.1% SC
free amino acids.
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Folio Gold: यामध्ये मेटालॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Areva: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड आणि पोषक तत्वांचे मिश्रण (Amino Acids + Nutrients) हा नैसर्गिक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ मेटालॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : फिनाईलअमाइड + क्लोरोनिट्रिल गट.
▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Areva हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
आळवणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Chlorothalonil हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून मुळांच्या आसपासच्या भागात संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे जमिनीतून होणारे बुरशीजन्य रोग (डॅम्पिंग ऑफ, रूट रॉट, ब्लाइट) यावर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
▸ Areva (Thiamethoxam 25% WG) :
आळवणीनंतर हे कीटकनाशक मुळांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो, हालचाल कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
हे विशेषतः जमिनीतून व वरच्या भागात येणारे रस शोषणारे कीटक (मावा, पांढरी माशी, थ्रिप्स) यांच्यावर प्रभावी नियंत्रण देते.
▸ Isabion (Amino Acids + Nutrients) :
हे अमिनो आम्ल व अन्नद्रव्ययुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. आळवणीनंतर मुळांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. अमिनो आम्ले मुळांची वाढ सुधारतात व ताणतणाव (उष्णता, पाण्याचा ताण) कमी करतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्ये पोषण संतुलन सुधारतात.
यामुळे मुळांची वाढ मजबूत होते, झाडाची जोमदार वाढ होते व उत्पादनक्षमता वाढते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Areva: 0.4 ग्रॅम
▸ Isabion: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Areva: 6 ग्रॅम
▸ Isabion: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Areva: 80 ग्रॅम
▸ Isabion: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Areva या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामध्ये Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. -
आले/हळद
▸ यामधील Folio Gold या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Areva या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामधील Isabion उत्पादनाचा वापर केल्यामुळे उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Dhanuka Areva
-
2. Syngenta Folio Gold
-
3. Syngenta Isabion
-