Skip to product information
1 of 1

Dhanuka Markar

Dhanuka Markar

Dhanuka

Regular price Rs. 159.00 INR
Regular price Rs. 161.00 INR Sale price Rs. 159.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Dhanuka Markar

MRP: ₹161
159
तब्बल ₹2 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Dhanuka
उत्पादनाचे नाव Markar 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Bifenthrin 10% EC
रासायनिक गट Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये बायफेन्थ्रिन १०% ई.सी. (Bifenthrin 10% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे स्पर्शजन्य आणि पोटविष गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीद्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या किंवा कोळीच्या संपर्कात आल्यास त्यांच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले झाडाचे भाग खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे मज्जासंस्थेतील सोडियम चॅनेल (Sodium Channels) उघडे ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे संदेशवहनात अडथळा निर्माण होतो. यामुळे कीटकाला तीव्र अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली ते ५०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरापुठ्ठ अळी (DBM)
    ▸ पाने खाणारी अळी

  • बटाटा

    ▸ मावा
    ▸ तुडतुडे

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ लाल भुंगेरे (Red Pumpkin Beetle)
    ▸ फळमाशी
    ▸ थ्रिप्स

  • आले,हळद

    ▸ कंदमाशी
    ▸ खोड पोखरणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ पिवळा कोळी (Yellow Mites)
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • वांगे

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ मावा
    ▸ थ्रिप्स

  • कापूस

    ▸ गुलाबी बोंडअळी
    ▸ अमेरिकन बोंडअळी
    ▸ ठिपक्यांची बोंडअळी
    ▸ पांढरी माशी

  • झेंडू

    ▸ थ्रिप्स
    ▸ अळी

  • शेवंती

    ▸ थ्रिप्स
    ▸ अळी

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ चक्री भुंगा

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ चक्री भुंगा

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • हरभरा

    ▸ घाटी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • वाटाणा

    ▸ घाटी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ थ्रिप्स
    ▸ मावा
    ▸ अळी

  • भात

    ▸ खोड किडा
    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ हिरवे तुडतुडे

  • गहू

    ▸ लष्करी अळी
    ▸ वाळवी (पाणी देताना किंवा सुरुवातीला)

  • मका

    ▸ लष्करी अळी
    ▸ वाळवी (पाणी देताना किंवा सुरुवातीला)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा

  • ▸बहुविध कीड नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. पांढरी माशी), पाने खाणाऱ्या अळ्या (उदा. बोंड अळी) आणि कोळी (Mites) या तिन्हींवर प्रभावीपणे कार्य करते.
    ▸उत्कृष्ट कोळीनाशक: हे एक प्रभावी कोळीनाशक देखील आहे, जे लाल कोळी आणि इतर कोळ्यांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवून देते.
    ▸त्वरित परिणाम (Knock-down): स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीच्या संपर्कात येताच तिला त्वरित नष्ट करण्यास सुरुवात करते.
    ▸दीर्घकाळ संरक्षण: हे पानांच्या पृष्ठभागावर चांगले चिकटून राहते, त्यामुळे किडींपासून दीर्घकाळ संरक्षण मिळते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कपाशी, भात (धान), ऊस आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरता येते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Dhanuka Markar हे Group 3A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि पिवळे चिकट सापळे यांचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा जलाशय जवळ असताना फवारणी टाळावी.