Skip to product information
1 of 1

Dhanuka LANEVO

Dhanuka LANEVO

Dhanuka

Regular price Rs. 470.00 INR
Regular price Rs. 470.00 INR Sale price Rs. 470.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Dhanuka LANEVO

₹470
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Dhanuka
उत्पादनाचे नाव LANEVO 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fluxametamide 5.81%+
Bifenthrin 5.81% EC

रासायनिक गट Isoxazoline +
Pyrethroid
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
जठर विष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये फ्लक्सामेटामाइड ५.८१% + बायफेंथ्रिन ५.८१% ई.सी. (Fluxametamide 5.81% + Bifenthrin 5.81% EC) हे दोन रासायनिक घटक असतात. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळणारे पायस स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे आयसोक्झॅझोलिन (Isoxazoline) आणि पायरेथ्रॉइड (Pyrethroid) या दोन वेगवेगळ्या रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक स्पर्शजन्य आणि जठर विष कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते . तसेच कीटक जेव्हा फवारणी झालेला पाला खातात किंवा रस शोषतात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते ). यामध्ये पानांच्या आरपार जाण्याचा गुणधर्म असल्याने पानाच्या मागे लपलेल्या किडींचेही नियंत्रण होते.

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर दुहेरी पद्धतीने परिणाम करते. हे GABA रिसेप्टर्स आणि सोडियम चॅनेल या दोघांवर एकाच वेळी कार्य करते. यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन पूर्णपणे कोलमडते, त्यांना अर्धांगवायू होतो, हालचाल व खाणे बंद होते आणि परिणामी त्यांचा त्वरित मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कळीवरील अळी (Diamondback Moth - DBM)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera)

  • बटाटा

    ▸ कटवर्म (खोड कापणारी अळी)
    ▸ बटाटा कुळका (Potato Tuber Moth)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • आले,हळद

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ कंद माशी (Rhizome Fly) - अंशतः नियंत्रण

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Fruit & Shoot Borer)
    ▸ थ्रिप्स

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • कापूस

    ▸ बोंड अळी (बोंड अळीचे सर्व प्रकार)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • ▸व्यापक नियंत्रण हे एकाच वेळी अळ्या (Larvae), थ्रिप्स (Thrips), कोळी (Mites) आणि पांढरी माशी यांसारख्या अनेक किडींवर नियंत्रण मिळवते.
    ▸नॉकडाउन इफेक्ट: यातील बायफेंथ्रिनमुळे कीड संपर्कात येताच जमिनीवर पडते आणि मरते.
    ▸प्रतिकारशक्तीवर मात: दोन वेगवेगळ्या गटांचे मिश्रण असल्यामुळे ज्या किडींनी जुन्या औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती मिळवली आहे, त्यांना मारण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.
    ▸दुहेरी गुणधर्म: हे कीटकनाशक आणि कोळीनाशक (Acaricide) अशा दोन्ही प्रकारे काम करते.
    ▸दीर्घकालीन परिणाम: हे पिकाला दीर्घकाळ संरक्षण देते, ज्यामुळे वारंवार फवारणीचा खर्च वाचतो.

  • ▸गटांची अदलाबदल लानेवो हे Group 30 + Group 3 चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. डोसमध्ये फेरफार केल्यास किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढू शकते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रसायनांवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.