Custodia + Alika Spray Kit

Custodia + Alika Spray Kit

Farmspot Shop

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Custodia + Alika Spray Kit

0
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक  Adama + Syngenta
किट नाव Custodia + Alika
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Custodia Azoxystrobin 11% +
Tebuconazole 18.3%
w/w SC
Alika  Thiamethoxam 12.60% +
Lambda-cyhalothrin 9.50% ZC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Nativo + Solomon Spray Kit

Rs. 2,250.00
Rs. 1,450.00

Custodia + Solomon Spray Kit

Rs. 1,150.00
Rs. 626.00

Amistar Top + Alika Spray Kit

Rs. 1,104.00
Rs. 815.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Custodia: यामध्ये अझोक्सिस्ट्रोबिन ११% + टेब्युकोनॅझोल १८.३% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Alika: यामध्ये थायामेथोक्साम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी हे कीटकनाशक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ अझोक्सिस्ट्रोबिन + टेब्युकोनॅझोल : स्ट्रॉबिल्युरिन + ट्रायझोल गट.
    ▸ थायामेथोक्साम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन : निओनिकोटिनॉइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Custodia हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
    ▸ Alika हे आंतरप्रवाही + स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Custodia (Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% w/w SC) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Azoxystrobin हा स्ट्रोबिल्युरिन गटातील घटक पानांच्या पृष्ठभागावर चिकटून ट्रान्सलॅमिनार व आंशिक प्रणालीगत पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या माइटोकॉन्ड्रियामधील श्वसन प्रक्रियेवर (QoI – Quinone outside inhibitor) परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते व बुरशीची वाढ रोखली जाते.
    Tebuconazole हा ट्रायझोल गटातील घटक असून बुरशीतील Ergosterol निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे पेशीभित्तीची निर्मिती बिघडते व मायसेलियमची वाढ थांबते.
    या संयुक्त क्रियेने डाग, ब्लाइट, रस्ट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व दीर्घकालीन नियंत्रण मिळते.

    ▸ Alika (Thiamethoxam 12.60% + Lambda-cyhalothrin 9.50% ZC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच आंशिक प्रणालीगत क्रिया दर्शवते.
    Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो व लकवा येतो.
    Lambda-cyhalothrin हा पायरेथ्रॉईड गटातील स्पर्शजन्य घटक असून Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडते व कीटकाचा मृत्यू होतो.
    या संयुक्त क्रियेने रस शोषणारे व चावणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Custodia: 1.5 मिली
    ▸ Alika: 0.4 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे मटकी, मूग, चवळी, उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Solomon हे कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • 1. Adama Custodia

  • 2. Syngenta Alika

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.