Curzate + Kocide Spray Kit

Curzate + Kocide Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Curzate + Kocide Spray Kit

0
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Corteva  
किट नाव Curzate + Kocide 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Curzate  Cymoxanil 8%+
Mancozeb 64% WP
Kocide  Copper Hydroxide 53.8% DF

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Curzate: यामध्ये सायमॉक्सॅनिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Kocide: यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८% डीएफ हा बुरशीनाशक व जिवाणूनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ सायमॉक्सॅनिल + मॅन्कोझेब : अलिफॅटिक नायट्रिल + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ कॉपर हायड्रॉक्साईड : अजैविक तांबे (Inorganic Copper) गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Curzate हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Kocide हे संपर्कजन्य बुरशीनाशक व जिवाणूनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Curzate (Cymoxanil 8% + Mancozeb 64% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Cymoxanil हा स्थानिक प्रणालीगत (Locally Systemic) व उपचारात्मक (Curative) गुणधर्म असलेला घटक पानांमध्ये प्रवेश करून बुरशीच्या पेशींतील वाढीवर परिणाम करतो. त्यामुळे सुरुवातीच्या संसर्ग अवस्थेत रोग नियंत्रणात येतो.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार थांबतो.

    ▸ Kocide (Copper Hydroxide 53.8% DF) :
    फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) तांब्या-आधारित बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Copper Hydroxide मधून मुक्त होणारे तांब्याचे आयन (Cu²⁺) बुरशी व जिवाणूंच्या पेशींतील एंझाइम क्रिया व प्रथिनांवर परिणाम करतात. त्यामुळे पेशींची कार्यक्षमता बिघडते व रोगजंतूंची वाढ थांबते.
    हे विशेषतः बुरशीजन्य तसेच काही जीवाणूजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी प्रभावी आहे.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Curzate: 2.5 ते 3 ग्रॅम
    ▸ Kocide: 2 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Curzate: 37.5 ते 45 ग्रॅम
    ▸ Kocide: 30 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Curzate: 500 ते 600 ग्रॅम
    ▸ Kocide: 400 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • 1. Corteva Kocide

  • 2. Corteva Curzate

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.