Skip to product information
1 of 1

Crystal Proclaim

Crystal Proclaim

Crystal

Regular price Rs. 79.00 INR
Regular price Rs. 112.00 INR Sale price Rs. 79.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Crystal Proclaim

MRP: ₹112
79
तब्बल ₹33 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
    Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Crystal Crop Protection
उत्पादनाचे नाव Proclaim 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Emamectin benzoate 5% SG
रासायनिक गट Avermectins
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य+
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Crystal Abacin

Rs. 433.00
Rs. 374.00

Best Agrolife Nemagen

Rs. 0.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये एमामेक्टिन बेंझोएट ५% एस.जी. (Emamectin Benzoate 5% SG) हा रासायनिक घटक असतो. जो SG स्वरूपात असतो. SG म्हणजे पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूप (Soluble Granules) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे 'एव्हरमेक्टिन' (Avermectin) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक स्पर्शजन्य आणि पोटविष गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीद्वारे वापरल्यानंतर थेट अळीच्या संपर्कात आल्यास तिच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच अळ्यांनी फवारणी केलेले पान खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action). यात 'ट्रान्सलॅमिनार' क्रिया असल्यामुळे पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या अळ्यांवरही हे प्रभावी ठरते.

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे मज्जासंस्थेतील 'क्लोराईड चॅनेल' सक्रिय करते, ज्यामुळे स्नायूंमध्ये सतत संदेशवहन होऊन ते आकुंचन पावतात. यामुळे अळीला २ ते ४ तासांत अर्धांगवायू होतो, ती अन्न खाणे बंद करते आणि काही वेळातच तिचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.४ ग्रॅम ते ०.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ८० ग्रॅम ते १०० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ लष्करी अळी (Spodoptera)
    ▸ फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM)

  • बटाटा

    ▸ बटाटा कंद पोखरणारी अळी (PTM)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • आले,हळद

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ लष्करी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा व फळ पोखरणारी अळी

  • भेंडी

    ▸ शेंडा व फळ पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ शेंडा व फळ पोखरणारी अळी

  • कापूस

    ▸ बोंड अळी (हिरवी, गुलाबी, ठिपक्यांची)
    ▸ लष्करी अळी

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ उंट अळी (Semilooper)
    ▸ लष्करी अळी
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • भुईमूग

    ▸ उंट अळी (Semilooper)
    ▸ लष्करी अळी
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)

  • हरभरा

    ▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ वेलावरील अळ्या
    ▸ फळमाशीच्या अळ्या

  • भात

    ▸ पान गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
    ▸ खोड किडा (Stem Borer)

  • गहू

    ▸ लष्करी अळी

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)

  • ▸अळ्यांवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने सर्व प्रकारच्या अळ्या, जसे की बोंड अळी, फळ पोखरणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी आणि लष्करी अळी यांच्यावर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
    ▸झटपट परिणाम: फवारणीनंतर अळ्या पिकाचे नुकसान करणे त्वरित बंद करतात.
    ▸ट्रान्सलॅमिनार गुणधर्म: पानांच्या एका बाजूला फवारणी केली तरी ते पानाच्या आरपार जाते, ज्यामुळे पानांच्या खाली लपलेल्या अळ्या नष्ट होतात.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे द्राक्ष, मिरची, सोयाबीन, कपाशी आणि सर्व भाजीपाला पिकांवर वापरता येते.
    ▸कमी डोस: अत्यंत कमी डोसमध्ये हे कीटकनाशक प्रभावी निकाल देते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Crystal Proclaim हे Group 6 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. डायमाइड्स) कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.