Corteva Tracer
Corteva Tracer
Corteva Agriscience
Corteva Tracer
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
पोटविष
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये स्पायनोसॅड ४५% एस.सी. (Spinosad 45% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे 'स्पिनोसिन' (Spinosyns) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे, जे नैसर्गिक जिवाणूंपासून (Saccharopolyspora spinosa) तयार केलेले जैविक मूळ असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे स्पर्शजन्य व पोटविष (Contact and Stomach) कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले पाने किंवा भाग खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून त्वरित परिणाम करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे प्रामुख्याने निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्स (nAChR) आणि GABA रिसेप्टर्सवर कार्य करून मज्जासंस्थेमध्ये अतिउत्तेजना निर्माण करते. यामुळे कीटकांना झटके येतात, अर्धांगवायू होतो आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.३७ मिली ते ०.४ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : ७५ मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिरा कूस अळी (Diamond Back Moth - DBM)
▸ पाने खाणारी अळी -
बटाटा
▸ बटाटा कंद अळी (Potato Tuber Moth)
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फळमाशी (Fruit Fly)
▸ पाने खाणारी अळी -
आले,हळद
▸ खोड किडा (Shoot Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी (Helicoverpa)
▸ नागअळी (Leaf Miner) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
▸ फळ पोखरणारी अळी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
-
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
-
गवार
▸ शेंग पोखरणारी अळी
-
कापूस
▸ बोंड अळी (Lepidopteran pests - American/Spotted Bollworm)
▸ थ्रिप्स (फुलकिडे) -
झेंडू
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
▸ पाने खाणारी अळी -
शेवंती
▸ थ्रिप्स (फुलकिडे)
▸ पाने खाणारी अळी -
सोयाबीन
▸ उंट अळी (Semilooper)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera) -
भुईमूग
▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)
▸ पाने खाणारी अळी -
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ फुलकिडे (Thrips) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी
▸ फुलकिडे (Thrips) -
हरभरा
▸ घाटा अळी (Helicoverpa)
-
वाटाणा
▸ घाटा अळी (Helicoverpa)
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळमाशी
▸ थ्रिप्स -
भात
▸ खोड किडा (Stem Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder) -
गहू
▸ लष्करी अळी
-
मका
▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
-
फ्रेंच बिन्स
▸ शेंग पोखरणारी अळी
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸अळ्यांवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने लष्करी अळी, बोंड अळी, फळ पोखरणारी अळी आणि हिऱ्यासारख्या पाठीचा ठिपका असलेल्या अळीवर (DBM) उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸थ्रिप्सवर नियंत्रण: हे फुलकिडे (Thrips) नियंत्रणासाठी देखील प्रभावी मानले जाते.
▸पर्यावरण पूरक: हे नैसर्गिक जिवाणूंपासून बनलेले असल्यामुळे पर्यावरणासाठी सुरक्षित आहे आणि सेंद्रिय शेतीतही काही प्रमाणात वापरले जाते.
▸कमी डोस, जास्त काम: अत्यंत कमी डोसमध्ये हे औषध किडींचा खात्मा करते.
▸उत्कृष्ट ट्रान्सलॅमिनार क्रिया: पानाच्या वरच्या बाजूला फवारले तरी हे पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या किडींना प्रभावीपणे मारते.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Corteva Tracer हे Group 5 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. डायमाइड्स) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध कोरडे झाल्यावर मित्र कीटकांना कमी धोकादायक असते, परंतु तरीही मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.