Blue Copper + Strepto Plus Spray Kit

Blue Copper + Strepto Plus Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Blue Copper + Strepto Plus Spray Kit

0
Quantity

Out of stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Crystal + JU 
किट नाव Blue CopperStrepto Plus
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Blue Copper  Copper oxychloride 50% WP
 Strepto Plus Streptomycin Sulphate 90% + Tetracycline Hydrochloride 10% SP

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Blue Copper: यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड ५०% डब्ल्यूपी हा बुरशीनाशक व जिवाणूनाशक घटक असतो.
    ▸ Strepto Plus: यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९% + टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड १% एसपी हे जिवाणूनाशक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ कॉपर ऑक्झिक्लोराईड : अजैविक तांबे (Inorganic Copper) गट.
    ▸ स्ट्रेप्टोमायसिन + टेट्रासायक्लिन : अँटीबायोटिक (Antibiotics) गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Blue Copper हे संपर्कजन्य बुरशीनाशक व जिवाणूनाशक आहे.
    ▸ Strepto Plus हे आंतरप्रवाही जिवाणूनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Blue Copper (Copper Oxychloride 50% WP) :
    फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) तांब्या-आधारित बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Copper Oxychloride मधून मुक्त होणारे तांब्याचे आयन (Cu²⁺) बुरशी व जीवाणूंच्या पेशींतील एंझाइम व प्रथिनांवर परिणाम करतात. त्यामुळे पेशींची कार्यक्षमता बिघडते, बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो.

    ▸ Strepto Plus (Streptomycin Sulphate 90% + Tetracycline Hydrochloride 10% SP) :
    फवारणीनंतर हे प्रतिजैविक (Antibiotic) संयोजन वनस्पतीच्या पृष्ठभागावर कार्य करते व जीवाणूंच्या पेशींमध्ये प्रवेश करते.
    Streptomycin व Tetracycline हे दोन्ही घटक जीवाणूंच्या प्रथिन संश्लेषण (Protein Synthesis) प्रक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे जीवाणूंची वाढ व विभाजन थांबते आणि संसर्ग नियंत्रणात येतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Blue Copper: 2 ग्रॅम
    ▸ Strepto Plus: 0.5 ग्रॅम (अंदाजे)

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Blue Copper: 30 ग्रॅम
    ▸ Strepto Plus: 6 ग्रॅम (1 पाकीट)

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Blue Copper: 400 ते 500 ग्रॅम
    ▸ Strepto Plus: 40 ते 50 ग्रॅम (7 ते 8 पाकिटे)

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • 1. Crystal Blue Copper

  • 2. JU Strepto Plus

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.