Bavistin + Admire+ Humic Acid Drenching kit
Bavistin + Admire+ Humic Acid Drenching kit
Farmspot Shop
Bavistin + Admire+ Humic Acid Drenching kit
Out of stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Humic Acid
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Bavistin: यामध्ये कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी हा बुरशीनाशक घटक असतो.
▸ Admire: यामध्ये इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Humic Acid: यामध्ये ह्युमिक ॲसिड (९८% किंवा ९५%) हा सेंद्रिय घटक असतो. -
रासायनिक गट
▸ कार्बेन्डाझिम : बेंझिमिडाझोल गट.
▸ इमिडाक्लोप्रिड : निओनिकोटिनॉइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Bavistin हे एक आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
▸ Admire हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Bavistin (Carbendazim 50% WP) :
बाविस्टीन हे आळवणीद्वारे दिल्यानंतर यातील 'कार्बेन्डाझिम' हा घटक मुळांद्वारे शोषला जातो आणि झाडाच्या सर्व भागांत पसरतो. हे बुरशीच्या पेशी विभाजनाच्या (Mitosis) प्रक्रियेत अडथळा आणून बुरशीची वाढ रोखते. हे प्रामुख्याने मुळकुज, मर रोग (Wilt) आणि खोडकुज यांसारख्या जमिनीतून पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे.
▸ Admire (Imidacloprid 70% WG) :
हे आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे. आळवणीनंतर 'इमिडाक्लोप्रिड' हा घटक मुळांद्वारे शोषला जाऊन संपूर्ण झाडामध्ये पसरतो. हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेतील निकोटिनिक ॲसिटिलकोलीन रिसेप्टर्सवर (nAChR) परिणाम करून मज्जासंस्थेचे कार्य विस्कळीत करतो. यामुळे कीटक खाणे बंद करतात आणि अर्धांगवायू होऊन त्यांचा मृत्यू होतो. हे विशेषतः जमिनीतील कीटक, पांढरी माशी आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी उत्कृष्ट आहे.
▸ Humic Acid (Potassium Humate 98%) :
हे सेंद्रिय जैव-उत्तेजक असून जमिनीचा पोत सुधारण्याचे काम करते. आळवणीनंतर हे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे झाड जमिनीतील खते आणि पाणी अधिक वेगाने शोषू शकते. हे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीला चालना देते आणि झाडाला प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची शक्ती प्रदान करते, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Bavistin: 1 ते 1.5 ग्रॅम
▸ Admire: 0.3 ते 0.5 ग्रॅम
▸ Humic Acid: 1 ते 2 ग्रॅम
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Bavistin: 15 ते 22 ग्रॅम
▸ Admire: 5 ते 7.5 ग्रॅम
▸ Humic Acid: 15 ते 30 ग्रॅम
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Bavistin: 250 ते 300 ग्रॅम
▸ Admire: 75 ते 100 ग्रॅम
▸ Humic Acid: 400 ते 500 ग्रॅम
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸ यामधील Bavistin या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Admire या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे रोप लागवडीनंतर किंवा बियाणे लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर तसेच नागअळी या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामध्ये Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते व रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा वर येतो. -
आले/हळद
▸ यामधील Bavistin या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर पिथियम बुरशीमुळे होणारी कोंबांची मर तसेच कंदकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Admire या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे कंद उगवणीनंतर कोवळ्या कोंबांवर येणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ यामधील Humic acid उत्पादनाचा वापर केल्यामुळे उगवून आलेल्या कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात ज्यामुळे निघणारे नवीन कोंब जोमदार निघतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Humic Acid
-
2. Crystal Bavistin
-
3. Bayer Admire
-