Skip to product information
1 of 1

Adama Takaf

Adama Takaf

Adama

Regular price Rs. 349.00 INR
Regular price Rs. 530.00 INR Sale price Rs. 349.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Adama Takaf

MRP: ₹530
349
तब्बल ₹181 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Adama
उत्पादनाचे नाव Takaf 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Diafenthiuron 47% +
Bifenthrin 9.4% w/w SC
रासायनिक गट
Thiourea +
Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये डायफेनथियुरॉन ४७% + बायफेन्थ्रिन ९.४% एस.सी. (Diafenthiuron 47% + Bifenthrin 9.4% w/w SC) हे रासायनिक घटक असतात. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे थायोयुरिया (Thiourea) आणि सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या दोन रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक संयुक्त (Combination) स्पर्शजन्य, पोटविष आणि बाष्प क्रिया (Contact, Stomach and Fumigant) असलेले कीटकनाशक व कोळीनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या किंवा कोळीच्या संपर्कात आल्यास त्यांच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले पान खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action). यातील बाष्प क्रियेमुळे पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या किडींचेही नियंत्रण होते.

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कार्य करते. डायफेनथियुरॉन कीटकांच्या पेशींमधील ऊर्जेची निर्मिती (ATP Synthesis) रोखते, तर बायफेन्थ्रिन मज्जासंस्थेतील सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे कीटकांना त्वरित अर्धांगवायू होतो, ते अन्न खाणे बंद करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.२५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : २५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ कोळी (Mites)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ मावा व तुडतुडे

  • बटाटा

    ▸ कोळी (Mites)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ लाल कोळी (Red Spider Mites) - (अत्यंत प्रभावी)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ मावा व तुडतुडे

  • आले,हळद

    ▸ कोळी (Mites)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ पाने खाणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ लाल कोळी (Mites)
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कोळी (Mites) - (मिरचीतील चुरडा-मुरडा व कोळी नियंत्रणासाठी सर्वोत्तम)
    ▸ पांढरी माशी

  • वांगे

    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी
    ▸ कोळी (Mites)

  • भेंडी

    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ कोळी (Mites)
    ▸ शेंडा पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ तुडतुडे व मावा
    ▸ कोळी (Mites)

  • कापूस

    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कोळी व बोंड अळी

  • झेंडू

    ▸ कोळी (Mites)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • शेवंती

    ▸ कोळी (Mites)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ पांढरी माशी
    ▸ कोळी (Mites)
    ▸ गर्डल बीटल व खोड माशी

  • भुईमूग

    ▸ कोळी (Mites)
    ▸ तुडतुडे व मावा
    ▸ पाने खाणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ मावा व तुडतुडे
    ▸ कोळी (Mites)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

    ▸ मावा
    ▸ घाटा अळी (सुरुवातीची अवस्था)

  • वाटाणा

    ▸ मावा
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ कोळी (Mites) - (वेलावरील कोळी नियंत्रणासाठी प्रभावी)
    ▸ पांढरी माशी
    ▸ फुलकिडे

  • भात

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गहू

    ▸ मावा
    ▸ कोळी (Mites)

  • मका

    ▸ लष्करी अळी (सुरुवातीची अवस्था)
    ▸ मावा व तुडतुडे

  • फ्रेंच बिन्स

    ▸ कोळी (Mites)
    ▸ मावा व तुडतुडे

  • ▸पांढऱ्या माशीवर रामबाण उपाय: हे प्रामुख्याने पांढरी माशी (Whitefly) च्या सर्व अवस्थांवर (अंडी, पिल्ले आणि प्रौढ) अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळवून देते.
    ▸कोळी नियंत्रण: हे एक उत्कृष्ट कोळीनाशक (Miticide) म्हणून कार्य करते, ज्यामुळे लाल कोळी व इतर कोळी नष्ट होतात.
    ▸नॉक-डाऊन परिणाम: बायफेन्थ्रिनमुळे किडीवर त्वरित परिणाम होतो, तर डायफेनथियुरॉनमुळे दीर्घकाळ संरक्षण मिळते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कपाशी, मिरची आणि भाजीपाला पिकांवरील जटिल कीड समस्यांसाठी (रसशोषक किडी + कोळी) उत्तम आहे.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत आणि पीक हिरवेगार राहते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Adama Takafहे Group 12A आणि Group 3A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा जलाशय जवळ असताना फवारणी टाळावी.