30:10:10 + Radifarm Drenching kit
30:10:10 + Radifarm Drenching kit
Farmspot Shop
30:10:10 + Radifarm Drenching kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
1% organic) and 8.0%
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Valagro 30:10:10 : यामध्ये नत्र 30%, स्फुरद 10% आणि पालाश 10% (NPK 30:10:10 + TE) हे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतात.
▸ Radifarm: यामध्ये ३.०% नत्र, ८.०% पालाश, पॉलिसेकेराइड्स, अमिनो ॲसिड्स आणि जीवनसत्त्वे हा जैव-उत्तेजक (Root Growth Promoter) घटक असतो. -
रासायनिक गट
▸ NPK30:10:10 : मुख्य अन्नद्रव्य (Primary Nutrients) गट.
▸ Radifarm : वनस्पतीजन्य सेंद्रिय जैव-उत्तेजक (Organic Biostimulant) गट. -
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
▸ 30:10:10 (N:P:K 30:10:10) :
हे एक उच्च नायट्रोजनयुक्त विद्रव्य खत असून झाडाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत (Vegetative Stage) अत्यंत महत्त्वाचे आहे. आळवणीद्वारे वापरल्यानंतर यातील नायट्रोजनमुळे झाडाची शाखीय वाढ जोमाने होते, पानांचा आकार वाढतो आणि पिकाला गडद हिरवेपणा येतो. यामध्ये असलेल्या अत्यल्प फॉस्फरस आणि पोटॅशमुळे मुळांना सुरुवातीचा आधार मिळतो आणि झाडाची काडी मजबूत होण्यास मदत होते.
▸ Radifarm (Biostimulant) :
हे वनस्पतींच्या मुळांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवलेले एक विशेष 'रूट प्रमोटर' आहे. आळवणीनंतर हे मुख्यत्वे करून नवीन पांढऱ्या मुळांची (Secondary and capillary roots) वाढ वेगाने करण्यास मदत करते. यामध्ये असलेले सेंद्रिय घटक आणि पोषक तत्वे रोप लागवडीनंतर येणारा ताण (Transplantation stress) कमी करतात, ज्यामुळे रोप जमिनीशी लवकर सेट होते आणि अन्नाचा शोषण प्रभावीपणे सुरू करते. -
वापरण्याची पद्धत
▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Valagro 30:10:10 6 ग्रॅम
▸ Radifarm: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Valagro 30:10:10 : 90 ग्रॅम
▸ Radifarm: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Valagro 30:10:10 : 1.2 किलो
▸ Radifarm: 400 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
▸यामधील Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुनर लागवड केल्यानंतर जो ताण येतो तो ताण कमी होतो. रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ होते व रोपे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला सुरुवात करतात. ज्यामुळे रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा येतो.
▸यामधील 10:54:10 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते रोपे सेट होऊन रोपांना नवीन दोन पानांचा शेंडा येतो.रोपांची पाने हिरवीगार, रुंद, पसरट होतात. -
आले/हळद
▸ यामधील Valagro Radifarm या उत्पादनाचा वापर केल्यामुळे कंद उगवून आल्यानंतर वातावरणाचा आलेला ताण कमी होतो. कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण वाढते.
▸यामधील Valagro 10:54:10 चा वापर केल्यामुळे कंदाच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, कंदमुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात, ज्यामुळे नवीन फुटवे निघायला लागतात निघणारे फुटवे जोमदार निघतात. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात.
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Valagro 30:10:10
-
2. Valagro Radifarm
-
-