Skip to product information
1 of 1

05:15:45 + Benefit PZ Spray Kit

05:15:45 + Benefit PZ Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 2,910.00 INR
Regular price Rs. 3,225.00 INR Sale price Rs. 2,910.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

05:15:45 + Benefit PZ Spray Kit

MRP: ₹3225
2910
तब्बल ₹315 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Valagro
किट नाव 05:15:45 + Benefit PZ
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

05:15:45  05% N + 15% P +45% K
 Benefit PZ Algae Extract,Protein
& Amino Acids

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ 05:15:45: यामध्ये नत्र (N 5%), फॉस्फरस (P 15%) आणि पोटॅश
    (K 45%) हे मुख्य अन्नद्रव्य घटक असतात. हे खत प्रामुख्याने फळांच्या फुगवणीसाठी, वजन वाढवण्यासाठी आणि फळांना आकर्षक रंग व चकाकी देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
    ▸ Benefit PZ: यामध्ये समुद्री शेवाळाचा अर्क (Algae Extract), प्रथिने (Protein) आणि अमिनो ॲसिड्स (Amino Acids) हे मुख्य घटक असतात. हे प्रामुख्याने पेशी विभाजनाद्वारे फळांचा आकार एकसमान वाढवण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानात झाडाची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाते.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ 05:15:45 (05%N +15%P +45%K)
    उच्च पोटॅश (45%): फळांची जलद फुगवण करणे, वजन वाढवणे आणि फळांना नैसर्गिक रंग व आकर्षक चकाकी देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
    फॉस्फरस (15%): फळांच्या पक्वतेच्या काळात झाडाला ऊर्जा पुरवते आणि पेशींची रचना मजबूत करते.
    कमी नत्र (05%): झाडाची वाढ मर्यादित ठेवून सर्व अन्नद्रव्ये आणि ऊर्जा केवळ फळांच्या विकासासाठी वळवते.
    क्वालिटी बूस्टर: फळांची प्रत सुधारते, साखर उतरवण्यास (Brix level) मदत करते आणि फळांची साठवणूक क्षमता (Shelf life) वाढवते.

    ▸ Benefit PZ (Algae Extract, Protein & Amino Acids)
    Cell Division (पेशी विभाजन): यामध्ये असलेले समुद्री शेवाळ अर्क आणि विशिष्ट घटक फळांमधील पेशी विभाजनाचा वेग वाढवतात, ज्यामुळे फळांचा आकार नैसर्गिकरीत्या आणि एकसमान वाढतो.
    Amino Acids & Protein: झाडाला तयार स्वरूपात प्रथिने आणि ऊर्जा मिळल्यामुळे प्रतिकूल हवामानातही (जास्त ऊन किंवा पाऊस) पीक तणावमुक्त राहते आणि फळांची गळती थांबते.
    Photosynthesis Boost: पानांमधील हरितद्रव्य वाढवून अन्न तयार करण्याची प्रक्रिया जलद करते, ज्यामुळे फळे फुगवणीच्या काळात झाड अशक्त पडत नाही.
    Stress Recovery: कीड-रोगांच्या प्रादुर्भावानंतर किंवा हवामानातील बदलामुळे पिकावर आलेला ताण झपाट्याने कमी करून पिकाला पुन्हा जोमाने वाढवते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Valagro 05:15:45: 6 ग्रॅम
    ▸ Valagro Benefit PZ : 2 ते 2.5 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ या फवारणी किटचा वापर वेलवर्गीय पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांची गळ थांबून जास्तीत जास्त फळधारणा होते, फळांची लांबी व जाडी वाढते, फळांचे वजन वाढते, फळांना नैसर्गिक रंग, चव व नैसर्गिक चकाकी येते.

  • आले,हळद

  • टोमॅटो

    ▸ या फवारणी किटचा वापर टोमॅटो पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांपासून फळधारणा होते, फळांचा आकार वाढतो, फळांचे वजन वाढते, फळांना नैसर्गिक रंग चव व नैसर्गिक चकाकी येते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ या फवारणी किटचा वापर मिरची पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांची गळ थांबून जास्तीत जास्त फळधारणा होते, मिरच्यांची लांबी व आकार वाढतो, फळांचे वजन वाढते, मिरच्यांना नैसर्गिक गडद रंग, तिखटपणा व नैसर्गिक चकाकी येते.

  • वांगे

    ▸ या फवारणी किटचा वापर वांगी पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांपासून जास्तीत जास्त फळधारणा होते, फळांचा आकार व घेर वाढतो, फळांचे वजन वाढते, वांग्यांना नैसर्गिक गडद रंग (काळा/जांभळा) व नैसर्गिक चकाकी येते.

  • भेंडी

    ▸ या फवारणी किटचा वापर भेंडी पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांपासून जास्तीत जास्त फळधारणा होते, भेंडीचा आकार व लांबी वाढते, फळांचे वजन वाढते, भेंडीला नैसर्गिक हिरवा रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • गवार

    ▸ या फवारणी किटचा वापर गवार पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांची गळ थांबून जास्तीत जास्त फळधारणा होते, शेंगांचा आकार व लांबी वाढते, शेंगांचे वजन वाढते, शेंगांना नैसर्गिक हिरवा रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • कापूस

  • झेंडू

    ▸ या फवारणी किटचा वापर झेंडू पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, कळ्यांची संख्या वाढून जास्तीत जास्त फूलधारणा होते, फुलांचा आकार व पाकळ्यांचा टवटवीतपणा वाढतो, फुलांचे वजन वाढते, फुलांना नैसर्गिक गडद रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • शेवंती

    ▸ या फवारणी किटचा वापर शेवंती पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, कळ्यांची संख्या वाढून जास्तीत जास्त फूलधारणा होते, फुलांचा आकार व पाकळ्यांचा टवटवीतपणा वाढतो, फुलांचे वजन वाढते, फुलांना नैसर्गिक गडद रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

    ▸ या फवारणी किटचा वापर वाल घेवडा पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांची गळ थांबून जास्तीत जास्त शेंगा धारणा होते, शेंगांचा आकार व लांबी वाढते, शेंगांचे वजन वाढते, शेंगांना नैसर्गिक हिरवा रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

    ▸ या फवारणी किटचा वापर वाटाणा पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांची गळ थांबून जास्तीत जास्त शेंगा धारणा होते, शेंगांचा आकार व दाण्यांचा टपोरेपणा वाढतो, शेंगांचे वजन वाढते, शेंगांना नैसर्गिक हिरवा रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ या फवारणी किटचा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांपासून जास्तीत जास्त फळधारणा होते, फळांचा आकार व गोडवा वाढतो, फळांचे वजन वाढते, फळांना नैसर्गिक रंग, चव व नैसर्गिक चकाकी येते.

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

    ▸ या फवारणी किटचा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, फुलांपासून जास्तीत जास्त शेंगा धारणा होते, शेंगांचा आकार व लांबी वाढते, शेंगांचे वजन वाढते, शेंगांना नैसर्गिक हिरवा रंग व नैसर्गिक चकाकी येते.

  • 1. Valagro 5:15:45

  • 2. Valagro MC Set

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.