Skip to product information
1 of 1

00:40:37 + Quikon Spray Kit

00:40:37 + Quikon Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,440.00 INR
Regular price Rs. 1,780.00 INR Sale price Rs. 1,440.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

00:40:37 + Quikon Spray Kit

MRP: ₹1780
1440
तब्बल ₹340 वाचवा
Size
Quantity

99 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा

Premium Crop Protection Kit

Farmspot Special Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Compo + Tradecorp
किट नाव 00:40:37 + Quikon
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

00:40:37 40% P + 37% K
Quikon Glutamic Acid 20.0%

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ 00:40:37 (Compo):
    यामध्ये फॉस्फरस (P₂O₅ – 40%) आणि पोटॅश (K₂O – 37%) हे मुख्य अन्नद्रव्य घटक असतात.
    ▸ Quikon (Glutamic Acid):
    यामध्ये ग्लुटॅमिक अॅसिड (Amino Acid) हा प्रमुख सेंद्रिय घटक असतो, जो वनस्पतींमध्ये प्रथिन निर्मिती व नायट्रोजन मेटाबोलिझम सुधारण्यास मदत करतो.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ 00:40:37 (Phosphorus 40% + Potassium 37%) :
    हे जलविद्राव्य (Water Soluble) खत असून फवारणीद्वारे पानांमधून जलद शोषले जाते.
    फॉस्फरस (P) मुळे मुळांची वाढ सुधारते, फुलधारणा वाढते व ऊर्जा हस्तांतरण (ATP निर्मिती) प्रक्रियेला चालना मिळते. त्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात व फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकाला ताकद मिळते.
    पोटॅशियम (K) पेशींतील जलसंतुलन नियंत्रित करते, एंझाइम क्रिया सक्रिय करते व रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच फळांचा आकार, रंग, गोडवा व गुणवत्ता सुधारते.
    या संयोजनामुळे फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेत उत्पादनक्षमता वाढते.

    ▸ Quikon (Glutamic Acid 20.0% w/w) :
    हे अमिनो आम्ल आधारित जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. Glutamic Acid हे प्रथिन निर्मितीमध्ये महत्त्वाचे घटक असून वनस्पतीतील नायट्रोजन चक्र (Nitrogen Metabolism) सुधारते.
    यामुळे ताणतणाव (उष्णता, दुष्काळ, कीड-रोग ताण) सहन करण्याची क्षमता वाढते, फुलधारणा सुधारते व पिकाची जोमदार वाढ होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ 00:40:37: 5 ग्रॅम
    ▸ Quikon: 1.5 ते 2 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ 00:40:37: 75 ग्रॅम
    ▸ Quikon: 22.5 ते 30 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ 00:40:37: 1 किलो
    ▸ Quikon: 300 ते 400 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ या फवारणी किटचा वापर कांदा पिकामध्ये केल्यामुळे नवीन पातींची निर्मिती होऊन पातींची संख्या वाढते, तसेच पाती रुंद, जाड, हिरवीगार व ताठ होतात. कांद्याची मान जाड व मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे अन्नाचा पुरवठा कांदा फुगवणीकडे चांगल्या प्रकारे होतो. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी झाल्यामुळे पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे कांद्याची फुगवण एकसमान होण्यास मदत होते, कांद्याला चांगला गडद रंग व चकाकी येते आणि साठवणूक क्षमता वाढते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांना नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे कोबी व रेड कॅबेजमध्ये गड्डा (Head) घट्ट व वजनदार भरण्यास मदत होते, तर फुलकोबी आणि ब्रोकोलीमध्ये फुलांचा आकार मोठा, पांढरशुभ्र/गर्दीत आणि एकसमान होतो. पिकाची अंतर्गत शक्ती वाढल्यामुळे काढणीच्या वेळी उत्पादनाची गुणवत्ता सुधारते व चकाकी वाढते.

  • बटाटा

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे बटाट्याच्या रोपांना नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडाची शाकीय वाढ संतुलित राहून तयार झालेली सर्व ऊर्जा जमिनीत बटाटे फुगवण्यासाठी (Tuber Development) वापरली जाते. परिणामी, बटाट्यांची संख्या वाढते, त्यांचा आकार एकसमान होतो आणि बटाट्याची साल जाड व चकाकीयुक्त होण्यास मदत होऊन साठवणूक क्षमता सुधारते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे वेलींना नवीन शेंडे व नवीन फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होऊन पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे वेलीवर मादी फुलांची संख्या वाढून नवीन फुलांची निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन वेलीला भरपूर प्रमाणात फळधारणा होण्यास मदत होते. फळांचा आकार एकसमान राहतो आणि त्यांना नैसर्गिक चकाकी प्राप्त होते.

  • आले,हळद

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे पिकाला नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि गडद हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडाची अन्नाची निर्मिती वाढून सर्व ऊर्जा कंद (Rhizome) फुगवणीसाठी वापरली जाते. परिणामी, आले व हळदीच्या कंदांची साइज व वजन वाढण्यास मदत होते, कंद जाड व सुडौल होतात आणि काढणीवेळी उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • टोमॅटो

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, होणारी फुलगळ ही रोखली जाते व पुढे जाऊन फुलांपासून चांगल्या प्रकारे फळधारणा होण्यास मदत होते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे मिरचीच्या रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात. नवीन पानांची निर्मिती होऊन पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे नवीन फुलांची (फूलकळी) मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. यामुळे होणारी फुलगळ रोखली जाते आणि पुढे जाऊन मिरचीची फळधारणा व लांबी वाढण्यास मोठी मदत होते. मिरचीला नैसर्गिक चकाकी व हिरवा गर्द रंग प्राप्त होतो.

  • वांगे

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे वांग्याच्या रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर नवीन फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून फळधारणा होण्यास मोठी मदत होते. वांग्यांचा रंग गडद होतो, त्यांना नैसर्गिक चकाकी प्राप्त होते आणि फळांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • भेंडी

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे भेंडीच्या रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर नवीन फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून शेंगांची (भेंडीची) फळधारणा होण्यास मोठी मदत होते. यामुळे भेंडीचा रंग गडद हिरवा राहतो, लांबी एकसमान होते आणि उत्पादनात वाढ होते.

  • गवार

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे गवारीच्या रोपांना नवीन शेंडे व फांद्या जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर नवीन फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते. यामुळे शेंगांचा आकार एकसमान होतो, शेंगांना तजेला येतो आणि उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • कापूस

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे कापसाच्या झाडाला नवीन शेंडे व फांद्या जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर नवीन पात्यांची आणि फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी पातेगळ व फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, बोंडांची संख्या वाढते, बोंडांचा आकार मोठा होतो आणि कापसाच्या लांबी व गुणवत्तेत सुधारणा होऊन उत्पादनात वाढ होते.

  • झेंडू

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे झेंडूच्या रोपांना नवीन शेंडे व फांद्या मोठ्या प्रमाणात फुटतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, जाड आणि गडद हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर नवीन कळ्यांची निर्मिती जोमाने होते, होणारी कळीगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि फुलांचा आकार मोठा व आकर्षक होण्यास मदत होते. फुलांच्या पाकळ्यांना तजेला मिळतो आणि फुलांचे वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • शेवंती

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे शेवंतीच्या रोपांना नवीन शेंडे व फांद्या मोठ्या प्रमाणात फुटतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, जाड आणि गडद हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर नवीन कळ्यांची निर्मिती जोमाने होते, होणारी कळीगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि फुलांचा आकार मोठा होण्यास मदत होते. यातील घटकांमुळे फुलांच्या पाकळ्यांना तजेला प्राप्त होतो, फुलांचा रंग अधिक गडद होतो.

  • सोयाबीन

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे सोयाबीनच्या रोपांना नवीन शेंडे व फांद्या (Branching) मोठ्या प्रमाणात फुटतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर फुलांची (फूलकळी) मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ व पातेगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि फुलांपासून शेंगांची संख्या वाढण्यास मोठी मदत होते. परिणामी, शेंगांमध्ये दाणे गच्च भरले जातात, दाण्यांचे वजन वाढते आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • भुईमूग

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे भुईमुगाच्या रोपांना नवीन फुटवे आणि फांद्या जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर मोठ्या प्रमाणात फुलांची निर्मिती होते आणि होणारी फुलगळ रोखली जाते. जमिनीखाली आऱ्या उतरण्याची प्रक्रिया वेगवान होऊन शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते. यातील पोषक घटकांमुळे शेंगांमधील दाणे गच्च भरले जातात, दाण्यांचा आकार व वजन वाढते आणि उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • वाल घेवडा 

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे वाल घेवड्याच्या वेलींना नवीन शेंडे व फांद्या मोठ्या प्रमाणात फुटतात, नवीन पानांची निर्मिती होऊन पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर नवीन फुलांची निर्मिती जोमाने होते, होणारी फुलगळ व पातेगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, शेंगांची संख्या व लांबी वाढते, त्यामध्ये दाणे गच्च भरले जातात आणि शेंगांना तजेला प्राप्त होऊन उत्पादनात मोठी वाढ होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे व फांद्या मोठ्या प्रमाणात फुटतात, नवीन पानांची निर्मिती होऊन पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. यामुळे झाडावर नवीन फुलांची निर्मिती जोमाने होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, शेंगांची संख्या वाढते, त्यामध्ये दाणे गच्च भरले जातात आणि दाण्यांना टपोरेपणा व नैसर्गिक चकाकी प्राप्त होऊन उत्पादनात मोठी वाढ होते.

  • हरभरा

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे हरभऱ्याच्या रोपांना नवीन फुटवे आणि फांद्या (Branching) मोठ्या प्रमाणात निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर घाटे लागण्यापूर्वी नवीन फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून घाटे धरण्याचे (फळधारणा) प्रमाण वाढण्यास मोठी मदत होते. यामुळे घाट्यांचा आकार एकसमान होतो, दाणे टपोरे भरले जातात आणि उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • वाटाणा

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे वाटाण्याच्या रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर नवीन फुलांची (फूलकळी) मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून शेंगांची संख्या वाढण्यास मोठी मदत होते. यामुळे शेंगांमध्ये दाणे गच्च भरले जातात, शेंगांचा हिरवा रंग टिकून राहतो आणि उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे कलिंगड व खरबूज पिकाच्या वेलींना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि गडद हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे वेलीवर मादी फुलांची संख्या वाढून नवीन फुलांची निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फळांची सेटिंग (फळधारणा) उत्तम प्रकारे होण्यास मदत होते. यातील पोटॅश आणि फॉस्फरसमुळे फळांचा आकार एकसमान होतो, फळांमध्ये गोडवा वाढतो आणि फळांना नैसर्गिक चकाकी प्राप्त होते.

  • भात

  • गहू

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे गव्हाच्या पिकाला नवीन फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे गव्हाची ओवी (ओंबी) मोठी आणि लांब निघण्यास मदत होते, ओवीमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण सुधारते आणि दाणे टपोरे व वजनदार होतात. यामुळे पिकाची कापणीपूर्वीची ताकद वाढते, दाण्यांना नैसर्गिक चकाकी येते आणि गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • मका

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे मक्याच्या रोपांना नवीन फुटवे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि गडद हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे मक्याचे ताट (खोड) जाड व मजबूत होण्यास मदत होते. यातील घटकांमुळे मक्याच्या कणसामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, कणीस तळापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे भरले जाते आणि दाण्यांची संख्या व वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ या फवारणी किटचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे फ्रेंच बिन्सच्या रोपांना नवीन शेंडे व फांद्या जोमाने निघतात, नवीन पानांची निर्मिती होते, तसेच पाने रुंद, पसरट, जाड आणि हिरवीगार होतात. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्यामुळे झाडावर नवीन फुलांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते आणि पुढे जाऊन फुलांपासून शेंगांची (Beans) संख्या वाढण्यास मदत होते. यामुळे शेंगांची लांबी व आकार एकसमान होतो, शेंगांना नैसर्गिक चकाकी येते आणि उत्पादनात मोठी वाढ दिसून येते.

  • 1. Compo 00:40:37

  • 2. Tradecorp Quikon

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.