टोमॅटो पिकात निळे – पिवळे चिकट सापळे का कधी व किती लावावेत.
Farmspot AgroShare
टोमॅटो पिकात चिकट सापळे का लावावेत?
▸ टोमॅटो पिकात निळे – पिवळे सापळे हे मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी लावायचे आहेत.
▸ निळे – पिवळे चिकट सापळयांचा वापर हा किडींचे प्रमाण किती आहे, हे जाणून घेण्यासाठी केला जातो. जेणेकरून योग्य उपाययोजना करता येतील.
टोमॅटो पिकात निळे – पिवळे चिकट सापळे कधी लावावेत?
▸ टोमॅटो पिकात निळे – पिवळे चिकट सापळे हे रोप लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनी लावावेत.
टोमॅटो पिकात 1 एकरामध्ये किती निळे – पिवळे चिकट सापळे लावावेत?
▸ एक एकरामध्ये एकूण 80 निळे – पिवळे चिकट सापळे लावावेत.
▸ यामध्ये निळे सापळे हे 40 असावेत व पिवळे सापळे 40 असावेत.
टोमॅटो पिकात निळे – पिवळे चिकट सापळे किती उंचीवर लावावेत?
▸ टोमॅटो पिकात निळे – पिवळे चिकट सापळे 1.5 ते 2 फुटावर लावावेत, कारण पहिल्या 25 दिवसांत टोमॅटो रोपांची वाढ हि 1.5 ते 2 फुटापर्यत होते व कोणतेही रसशोषक किड हि रोपांच्या शेंड्यायावर प्रादुर्भाव करते.
निळ्या पिवळ्या चिकट सापळयांचा कालावधी किती असतो?
▸ निळ्या पिवळ्या चिकट सापळयांचा कालावधी हा 15 ते 20 दिवस असतो.
▸ त्यानंतर त्याचा चिकटपणा कमी होतो. त्यामुळे 15 ते 20 दिवसांनंतर चिकट सापळे बदलावेत, किंवा त्यांचा पून्हा चिकट गम लावावा.