उन्हाळी किंवा हिवाळी टोमॅटो लागवड केल्यानंतर रोपांना कागदी कप का लावावेत?
Farmspot AgroShare
▸ उन्हाळी व हिवाळी लागवडीमध्ये सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरल्यानंतर सिल्व्हर रंग हा सूर्यप्रकाशाचे शोषण करतो, ज्यामुळे मल्चिंग पेपरच्या आतमध्ये गरम तयार होते. ती वाफ जेव्हा आपण रोपांची लागवड करतो तेव्हा त्या होलातून बाहेर येते, ज्यामुळे रोपांच्या खोडाला इजा होऊन रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होतो.ती रोपांची मर होऊ नये म्हणून रोप लागवड केल्यानंतर प्रत्येक रोपास कागदी कप टाकावेत.कागदी कपांना बुकागदी (कागदी कपांना बूड नसते)असावेत, जेणेकरून मल्चिंग मध्ये तयार झालेली वाफ होलातून थेट रोपांवर(खोडावर किंवा खालील पानांवर) न येता कपावर येते. ज्यामुळे रोपांना इजा होत नाही व रोपांची मर सुद्धा होत नाही व पाने सुद्धा पिवळी पडत नाहीत.
▸ टोमॅटो पिकात येणाऱ्या स्टेमफायलियम ठिपके,सेप्टोरिया ठिपके व जिवाणूजन्य काळे ठिपके या बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांमध्ये काय फरक असतो व तो कसा ओळखावा.
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके हा Stemphyllium solani या बुरशीमुळे येणारा थर सेप्टोरिया ठिपके हा Septoria Lycoperisci या बुरशीमुळे येणारा बुरशीजन्य रोग आहे.व जिवाणूजन्य काळे ठिपके हा Xanthomomas या जिवाणूंमुळे येणारा जिवाणूजन्य रोग आहे.
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव - 20% C तापमान असताना व आद्रता 80% पेक्षा जास्त असताना ओलसर वातावरणात होतो,तर सेप्टोरिया काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव 29० C तापमान असताना व आद्रता 80% ते 90% पेक्षा जास्त असताना होतो तर जिवाणूजन्य 7-8 तास पानांवर पाणी साठून राहिल्यामुळे होतो.
▸ जेव्हा सतत ओलावा असतो व अशातच आद्रता वाढते तेव्हा स्टेमफायलियम या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होते, तर पाऊस पडून गेल्यानंतर खालील पानांवर खोडावर, फांद्यावर माती उडते तेव्हा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या मातीद्वारे होतो.तर पावसाचे पाणी 7 ते 8 तासांपेक्षा जास्त काळ पानांवर राहिल्यामुळे जीवाणूजन्य रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होतो.
▸ स्टेमफायलियम ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात ओलाव्याद्वारे पावसाच्या पाण्याद्वारे, शेतमजुरांद्वारे होतो. तर सेप्टोरिया ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात सिंचनामुळे,माती उडते,पावसाच्या पाण्यामुळे माती उडते,व मजुरांच्या साह्याने होतो.तर जिवाणूजन्य ठिपके या जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात पानांवर असणाऱ्या ओलाव्यामुळे होतो.
▸ स्टेमफायलियम ठिपके हे राखाडी रंगाचे असतात ठिपक्यांच्या कडा या फिकट जांभळ्या रंगाच्या असतात,हे ठिपके पानांच्या कडेच्या बाजूला पहिल्यांदा येतात व नंतर मधल्या भागाकडे सरकतात याचे प्रमाण एका पानावर एकापेक्षा जास्त असते. कालांतराने त्याचा आकार वाढतो व ते ठिपके एकमेकांत दिसतात व मोठे राखाडी रंगाचे चट्टे तयार होतात. हे प्रामुख्याने या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोवळ्या पानांवर म्हणजेच रोपांच्या वरील भागांवर दिसतात.
▸ सेप्टोरिया ठिपके हे काळ्या रंगाचे असतात याची लक्षणे प्रामुख्याने खालील पानांवर फांद्यांवर, खोडावर दिसतात. एका पानावर एकापेक्षा जास्त ठिपके असतात त्या ठिपक्यांची प्रभावर पिवळी असते, प्रादुर्भाव वाढेल तस तसे ठिपक्यांचा आकार व ठिपक्यांचे प्रमाण वाढते. व ते ठिपके एकमेकांत मिसळतात व कालांतराने पाने गळून जातात.
▸ जीवाणूजन्य ठिपके हे काळ्या रंगाचे असतात याची लक्षणे वनस्पतींच्या सर्व भागातील पानांवर व फांद्यांवर दिसतात. यामध्ये एका पानावर एकापेक्षा जास्त ठिपके असतात. हि प्राथमिक प्रादुर्भावाची लक्षणांमध्ये ठिपके पिवळसर रंगाचे असतात व कालांतराने ते काळे होतात.
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके,रोप रुजण्याची अवस्था,रोप वाढीची अवस्था,फुल अवस्था व फळधारणेच्या अवस्थेत येतात.
▸ सेप्टोरिया काळे ठिपके रोप रुजण्याची अवस्था,रोप वाढीची अवस्था,फूल अवस्था, फळधारण्याची अवस्था असताना येतात.
▸ जिवाणूजन्य काळे ठिपके रोप वाढीची अवस्था ते फळ तोडणीच्या अवस्था दरम्यान येतात.