टोमॅटो रोपांच्या खोडाचा विकास हा रोप वाढीच्या अवस्थेत होत असतो. टोमॅटो रोपांचे खोड जेवढे जाड असते, तेवढे निघणारे फुटवे व शेंडे जाड निघतात, याचा फायदा असा होतो की फुल अवस्थेत फुलांची संख्या चांगली मिळते. शिवाय फुलांची गुणवत्ता सुद्धा चांगली असते. तसेच रोपांवर अजैविक ताण कमी होतो. व फुलगळ होत नाही, तसेच फळधारणा चांगल्या प्रकारे होते. फळांचा आकार ही चांगल्या प्रकारे वाढतो, व संपूर्णपणे उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होते.