टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर का वापरावा ?
Farmspot AgroShare
टोमॅटो लागवड केल्यानंतर एकरी 40-50 टन उत्पादन घेण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करणे गरजेचे आहे, ज्यामुळे टोमॅटोसाठी लागण्याऱ्या खर्चामध्ये बचत होते. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे खालील फायदे होतात ज्यामुळे खर्चात बचत होते.
✅ फायदे
▸ मल्चिंग पेपर टाकल्यामुळे ज्या तणांचे बी अंकुरते अशा तणांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे वाढ होत नाही आणि ती जळून जातात; नैसर्गिकरित्या तण नियंत्रण होते.
▸ उन्हाळ्यामध्ये व्हाईट ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर टाकल्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर न येता तो मल्चिंग पेपरवर पडतो व परावर्तित होतो. त्यामुळे जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येते.
▸ हिवाळ्यामध्ये सिल्व्हर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर टाकल्यामुळे सूर्यप्रकाश शोषण केला जातो, जमिनीचे तापमान वाढते आणि रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.
▸ मल्चिंग पेपर टाकल्यामुळे वनस्पतीच्या पानांचा थेट जमिनीशी संपर्क होत नाही. त्यामुळे जमिनीत असलेल्या बुरशींचा प्रादुर्भाव होत नाही आणि बुरशिजन्य रोगांवर एकात्मिक नियंत्रण मिळते.
▸ मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमीन मोकळी व भुसभुशीत राहते. जमिनीमध्ये हवेचे प्रमाण वाढते, पांढऱ्या मुळांची वाढ जोमदार होते आणि जिवाणूंची कार्यक्षमता वाढते.
अशा प्रकारे उत्पादन वाढीच्या दृष्टीने मल्चिंग पेपरचा वापर करणे गरजेचे आहे.