टोमॅटो लागवडीसाठी ठिबक सिंचनचा वापर का करावा ?

Farmspot Agro

टोमॅटो पिक लागवड केल्यानंतर एकरी 40 टन पेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, ज्याद्वारे आपण चांगले उत्पादन घेण्याबरोबरच खर्च सुद्धा कमी करतो.

✅ ठिबक वापरल्याचे फायदे

▸ ठिबकसिंचन ही थेट रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची पद्धत आहे.
▸ त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व पाण्याची बचत होते.
▸ त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
▸ या सिंचन पद्धतीद्वारे पिकास गरजेनुसार पाणी देता येते, ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
▸ नियंत्रण पद्धतीने पाणी दिल्याने शेतामध्ये येणारे तण कमी प्रमाणात येतात.
▸ त्याचबरोबर जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.
▸ थेट मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाफसा स्थिति राहिल्यामुळे मुळ्यांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते.
▸ ज्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येते. ठिबक सिंचन मध्ये विविध प्रकार येतात.

✅ ठिबकचे प्रकार व आकार त्यानुसार निवड

▸ ज्यामध्ये Non ISI व ISI ठिबक असे दोन प्रकार पडतात. तसेच ठिबक हे 16mm व 20mm अशा दोन आकारामध्ये येते. जर शेताची लांबी 200 फुट पेक्षा कमी असेल तर 16mm ठिबक वापरावे; शेताची लांबी 200 फुट पेक्षा जास्त असेल तर 20mm ठिबक वापरावी.
▸ त्याचबरोबर पाण्याच्या डिस्चार्जनुसार दोन प्रकार येतात. जर भाजीपाला पिके घेत असाल तर 2.5 लिटर डिस्चार्ज असणारी ठिबक वापरावी; जर ऊस, आले व इतर फळे पिके घेत असाल तर 4 लिटर डिस्चार्ज ठिबक वापरावे.

✅ ठिबक सिंचन आणि विद्राव्य खत नियोजन

▸ ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे विद्राव्य खतांचे नियोजन करता येते, ज्यामध्ये रोपांची वाढीची अवस्था लक्षात घेऊन गरजेनुसार अन्नद्रव्ये नियोजन करता येते. त्यामुळे खतांवरील अनावश्यक खर्च कमी होतो व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. यामुळे टोमॅटो लागवड करताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर नक्की करावा.

Back to blog