टोमॅटो पिकात पानांचा आकार रुंद,पसरट,जाड व हिरवागार असणे का गरजेचा आहे.
Farmspot AgroShare
▸ टोमॅटो पिकात पानांचा आकार रुंद,पसरट असणे व त्याबरोबर पाने जाड व हिरवीगार असणे, हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
▸ पाने ही वनस्पतींचा मुख्य अवयव आहेत. टोमॅटोची पाने नसतील तर टोमॅटो हे पीक नसेल. टोमॅटोची पाने ही प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतील प्रमुख अवयव आहे.
▸ पानांमध्येच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया होत असते. जेवढी टोमॅटोची पाने आकाराने रुंद, पसरट असतात, तेवढे पानांचा आकार मोठा असतो. ज्यामुळे जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशचे पानांद्वारे शोषण केले जाते.
▸ तसेच सूर्यप्रकाश शोषण करण्यासाठी पानांचा हिरवा रंग सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, जेवढा पानांचा हिरवा रंग गडद असतो. तेवढा सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे शोषण केला जातो. पानांचा हिरवा रंग हा पानांच्या मधील हरितकणांच्या प्रमाणावरून ठरतो.
▸ तसेच जेवढा पानांचा आकार रुंद, पसरट असतो, तेवढे पर्णरंद्राचे प्रमाण जास्त असते. ज्याद्वारे वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी कार्बन डाय-ऑक्साइड आतमध्ये शोषते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून तयार झालेला ऑक्सिजन वातावरणात सोडते.
▸ अशा प्रकारे पानांचा आकार रुंद, पसरट व रंग हिरवा असणे वनस्पतींच्या प्रकाशनसंश्लेषण प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे. जर वनस्पतींची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरळीत चालते तर, जास्त प्रमाणात अन्न निर्मिती होईल व ते तयार केलेले अन्न रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी वापरले जाईल. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगला होतो व उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.